कोपरगाव (वार्ताहर)
कोपरगाव तालुक्यात अतिशय प्रतिष्ठेच्या कुंभारी ग्रामपंचायतच्या प्रथम महिला लोकनियुक्त सरपंचपदी सौ देवयानी प्रशांत घुले यां अतिशय चुरशीच्या निवडणुकीत अपक्ष निवडून आल्या. तसेच त्यांच्यासह 6 सदस्य निवडून आले. त्यांचा पदग्रहण समारंभ तसेच उपसरपंच निवडणूक नवनियुक्त प्रथम महिला सरपंच देवयानी प्रशांत घुले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत निवडणूक प्रक्रिया पार पडली. त्यात दिलीप वामन ठाणगे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली .
सदरप्रसंगी नवनियुक्त सरपंच,उपसरपंच,सदस्या यांचा फेटे बांधून सत्कार समारंभ तसेच अनोखा असा शपतविधि सोहळा पर पडला. दिलीप वामन ठाणगे यांचे नावाची सुचना कविता ललित कुमार निळकंठ यांनी केली. ग्रामपंचायत सदस्य राहुल विश्वनाथ पवार, रामराव दगू चंदनशिव ,रंजना सिताराम गायकवाड ,ज्योती सचिन अहिरे , कोल्हे गटाचे मनीषा सागर घुले , काळेगटाचे वैशाली सुभाष बढे, यांनी या प्रक्रियेत भाग घेतला. नवनिर्वाचित प्रथम महिला लोकनियुक्त सरपंच सौ देवयानी प्रशांत घुले व नवनिर्वाचित उपसरपंच दिलीप वामन ठाणगे व सर्व सदस्यांचा सत्कार करण्यात आला.. ज्येष्ठ नेते शिवाजीराव घुले, तंटामुक्तीचे अध्यक्ष शंकरराव सहादु शेळके, प्रथम लोकनियुक्त सरपंच प्रशांतजी घुले,अशोकराव वाघ, माजी सरपंच अर्जुनराव घुले, त्र्यंबकराव वाघ, पांडुरंग पवार , सखाहारी देवकर, रामदास पवार, गुलाब मोरे, माधव चंदनशिव , सुदामराव घुले,शिवाजी भारती, सुभाष घुले ,दशरथ चंदनशिव तुकाराम माळी ,भास्कर भारती , भानुदास घुले,विठ्ठल घुले ,नानासाहेब पवार,वसंत घुले, ललित निळकंठ, वाल्मीक ठाणगे, गणेश निळकंठ, दगू चंदनशिव ,नानासाहेब शेजवळ, अण्णासाहेब चव्हाण ,श्रीराम घुले सागर घुले,अभिजीत चकोर ,अमोल कोकाटे , आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तालुका कृषी अधिकारी सोनवणे साहेब, कुंभारी ग्रामपंचायतचे ग्रामसेवक कहार भाऊसाहेब ,कुंभारी तलाठी वडीतकेआप्पा , पोलीस पाटील पंडित पवार, ग्रामपंचायत कर्मचारी आदी उपस्थित होते.