येवला प्रतिनिधी
संत संगतीचे काय सांगू सुख,आपणा पारीखे नाही जेथ…! साधु थोर जाणा..साधु थोर जाणा साधु थोर जाणा कलियुगी..! या अभंगाप्रमाणे संत महात्म्यांचे समाजसुधारणेत योगदान आजही महत्त्वाचे आहे.वारकरी संप्रदायाची पताका फडकावत समाजाला दिशा देण्याचे कार्य करणाऱ्या तालुक्यातील कीर्तनकार,प्रवचनकारांचा सन्मान येथील कुणाल दराडे फाउंडेशनच्या वतीने करण्यात आला.
येवला-लासलगाव परिसरातील २०० वर महंत,संत,कीर्तनकार,प्रवचनकार,मृदंगाचार्य,टाळकरी,विणेकरी आदी वारकरी यावेळी उपस्थित होते.आसरा लॉन्स संत मंडळींच्या उपस्थितीने प्रसन्नमय होऊन भक्तिभावाने फुलून गेले होते.फाउंडेशनचे संस्थापक कुणाल दराडे यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम झाला तर वारकरी संप्रदायाचे तालुकाध्यक्ष विठ्ठल शेलार यांचे विशेष सहकार्य लाभले.
या कार्यक्रमाला व्यासपीठावर महंत लालबाबामहाराज,नवनाथमहाराज नगरसुलकर,जंगली महाराज आश्रमाचे महंत शिवानंद महाराज,महंत रामनाथ महाराज मोरे,महंत स्वामी वासुदेवानंदगिरी महाराज,महंत साईनंदगिरी महाराज आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती.
वारकरी पुरस्कार पुरस्कार प्राप्त विठ्ठल शेलार व संत सेवा पुरस्कार प्राप्त दत्तोपंत डुकरे यांचा यावेळी विशेष सन्मान करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाला अंबादास जगताप,नारायण काळे, तुकाराम महाराज पवार,ज्ञानेश्वर पवार, रामनाथ खैरनार गारखेडेकर,बाळासाहेब शिरसाठ,रामकृष्ण सानप,शिवाजी गायके,निवृत्ती रायते,माणिकराव दौंडे, गुडघेताई महाराज,पंढरीनाथ ढगे,रमन शेळके,गोकुळ होंडे,ढोकळे महाराज, सुभाष बोराडे,केशव आहेर,बाळासाहेब वाघचौरे,शिवाजी आव्हाड आदी सुमारे २०० संत मंडळीचा सन्मानपूर्वक गौरव करून त्यांच्या कार्याचा यथोचित सन्मान करण्यात आला.यावेळी कुणाल दराडे तसेच फाऊंडेशनच्या सदस्यांच्या हस्ते देखील या संत मंडळींचा सन्मान करण्यात आला.
वारकरी संप्रदायाची पताका एकविसाव्या शतकातही फडकवत ठेवण्याचे कार्य आज संत मंडळी करत आहे.आपली लालित्यपूर्ण भाषा,सुमधूर गायन,सुंदर दृष्टांतातून कीर्तन-प्रवचनाच्या माध्यमातून समाजप्रबोधनाची मोठी परंपरा वारकऱ्यांनी जपली आहे.या योगदानाचा गौरवासाठी संतपूजन सोहळ्याचे आयोजन केल्याची माहिती यावेळी कुणाल दराडे यांनी दिली.संत पूजनाचा असा सोहळा आयोजित करून गावोगावी प्रबोधनाचे कार्य करणाऱ्या संत मंडळींचा गौरव झाल्याने त्यांच्या या सामाजिक कार्याला अजून प्रेरणा मिळणार असल्याचे विठ्ठल शेलार यांनी सांगितले व या उपक्रमाचे कौतुक करत आभार मानले.
यावेळी जयवंत खाबेकर,दिनेश आव्हाड, विजय गोसावी,मकरंद तक्ते,अतुल घटे,मयुर मेघराज,मंदार पटेल,गौरव पटेल,सुमित गायकवाड,भूषण शिनकर, प्रसाद निकम,किरण कुलकर्णी,राहुल भावसार,योगेश लचके,शेखर शिंदे,राजू वाडेकर,तुषार शिंदे,अक्षय राजपूत, मोफिज अत्तार,आत्मेश विखे,गौतम बाफना,सुनील काटवे,मयूर वाळूंज,संदीप चव्हाण, विक्की वैद्य,गणेश दराडे,विशाल शिंदे,सतीश ठोंबरे,प्रशांत जाधव,सिद्धार्थ धिवर आदीनी संयोजन केले.ऍड.आनंद राशीनकर यांनी सूत्रसंचालन केले.