कोपरगाव प्रतिनिधी : कोपरगाव तालुक्यातील कुंभारी येथे पार पडलेल्या कोळपेवाडी केंद्राच्या विविध गुणदर्शन स्पर्धेत हिंगणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने आठ पारितोषिक मिळवत नेत्रदीपक कामगिरी केली. या स्पर्धेत घवघवीत यश मिळवल्याबद्दल हिंगणी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी शाळेचे शिक्षक व विद्यार्थी यांचे अभिनंदन केले. हस्ताक्षर स्पर्धेत बालगटात आदित्य गणेश चंदनशिव यांनी प्रथम क्रमांक मिळवला. किलबिल गटात अनिरुद्ध निलेश पवार यांने प्रथम क्रमांक मिळवला.वेशभूषा सादरीकरणात किशोर गट वैयक्तिक गीत गायन स्पर्धेत वैष्णवी पंकज गांगुर्डे हिने प्रथम क्रमांक मिळवला. या तीन विद्यार्थ्यांची तालुका सरासाठी निवड करण्यात आली.
तसेच वकृत्व स्पर्धा किलबिल गटामध्ये हर्षद गणेश चंदनशिव याने तृतीय क्रमांक पटकावला. वकृत्व स्पर्धा बालगटामध्ये अभिलाषा त्रिभुवन पवार हिने द्वितीय क्रमांक पटकावला. वेशभूषा सादरीकरणात बालगटात श्रेया निलेश पवार तृतीय क्रमांक, किशोर गटात दुर्गा कुमारपंडित पवार तृतीय क्रमांक, वैयक्तिक गीत गायन बाल गटात मनीषा पोपट अटक द्वितीय क्रमांक पटकावला. या सर्व विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले. त्यांना शाळेचे मुख्याध्यापक रमेश गावित्रे, शिक्षक वाल्मीक निळकंठ, संतोष थोरात यांचे मार्गदर्शन लाभले.