कोपरगांव क्रेडाई तर्फे महात्मा गांधी, लालबहादुर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण

0

कोपरगांव : कोपरगांव क्रेडाई तर्फे आज महात्मा गांधी तसेच लालबहादुर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त व महाराष्ट्राच्या वृक्षारोपण चळवळ २०२४ अंतर्गत नरोडे पाटील नगर व श्रीराम पार्क या परिसरात १०० झाडे लावणे व त्यांचे  संवर्धन करणे हा कार्यक्रम मुख्याधिकारी सुहास जगताप यांच्या हस्ते उत्साहात पार पडला .

बांधकाम व्यवसाय करताना प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे निसर्गाची अपरिमित हानी होत असते. त्यांची परतफेड ही कुठल्याही पैशाने होत नाही ती फक्त निसर्ग संवर्धनानेच होऊ शकते, तसेच निसर्ग आपणास  भरभरून सदैव देत असतो परंतु त्यामुळे त्याचीही कुठे न कुठे हानी होतच असते याची जाणीव लक्षात घेऊन निसर्गाचे संवर्धन करण्याचे काम क्रेडाई कोपरगांव दरवर्षी करतात याचा मला अभिमान वाटतो तसेच असे सर्व संघटनांती  वृक्षरोपणाचे  कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर घेतले पाहिजेत असे प्रतिपादन मुख्याधिकारी  सुहास जगताप यांनी याप्रसंगी केले. तसेच अध्यक्ष प्रसाद नाईक यांनी निसर्ग संवर्धनाचे महत्त्व पटवून दिले व पुढील काळात अजून मोठ्या प्रमाणात वृक्षरोपण करण्याचे काम क्रेडाई कोपरगांव करेल याची त्यांनी ग्वाही  दिली.

संघटनेचे जेष्ठ सभासद व आर्कीटेक्ट रवीकिरण डाके यांनी ग्रीन शिर्डी अंतर्गत काम करताना आलेल्या अनुभवाचे कथन केले. मुख्याधिकारी यांचा सत्कार संघटनेचे  अध्यक्ष प्रसाद नाईक यांनी केला, नरोडे पाटील नगरचे संस्थापक दत्तात्रय नरोडे यांचा सत्कार उपाध्यक्ष विलास खोंड यांनी केला व नगररचना सहाय्यक किरण जोशी यांचा सत्कार सचिव चंद्रकांत कौले यांनी केला.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सभासद राजेश ठोळे यांनी केले. तर आभार सचिव चंद्रकांत कौले यांनी मानले. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here