कोपरगाव काँग्रेस कमिटीच्यावतीने आ.बाळासाहेब थोरात यांचा सत्कार

0

कोपरगाव : महाराष्ट्र राज्याचे माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची कॉग्रेस वर्किंग कमिटीच्या सदस्यपदी नियुक्ती झाल्याने कोपरगाव काँग्रेस कमिटीच्याच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी तालुक्याचा आढावा,आगामी निवडणुक रणनीती रणनीती, पदाधिकारी व पक्ष विस्तार यावर चर्चा झाली. लवकरच जिल्हा संवाद दौऱ्याच्या निमित्ताने कोपरगावला पक्षाचा मेळावा आ. बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वात व उपास्थितीत घेणार असल्याचे शहराध्यक्ष तुषार पोटे यांनी सांगितले.

काँग्रेस पक्षात काम करू इच्छित असणाऱ्यांनी संपर्क करण्याचे आवाहन या निमित्ताने करण्यात आले. यावेळी कोपरगाव काँग्रेस शहराध्यक्ष तुषार पोटे,प्रदेश सचिव नितीन शिंदे,जिल्हा सरचिटणीस सुनिल साळुंखे, किसान काँग्रेसचे अध्यक्ष विजय जाधव,काँग्रेस सेवादलचे तालूकाध्य ज्ञानेश्वर भगत,शहर सचिव लखन फुलकर,युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष सागर बारहाते, विद्यार्थी काँग्रेस तालुकाध्यक्ष हृषीकेश पगारे व आदी पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here