कोपरगावच्या ग्रामीण रस्त्यासाठी जिल्हा नियोजनमधून ८० लाख निधीं मंजूर आमदार आशुतोष काळे

0

 कोळपेवाडी वार्ताहर-  कोपरगाव  मतदार संघाच्या ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी जिल्हा नियोजन समितीकडून  ८० लाख रुपये निधीला मंजूरी देण्यात आल्याची माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली आहे. मतदार संघाच्या रस्ते विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरु असून या पाठ्पुराव्यातून मतदार संघातील ग्रामीण रस्त्यांसाठी जिल्हा नियोजन समितीने करंजी, वडगाव व वेस येथील ३.०५ किलोमीटर रस्त्यासाठी व कोळपेवाडी येथील सी.डी. वर्क कामासाठी पुन्हा ८० लाख रुपये निधी दिला असून लवकरच या रस्त्याच्या कामास सुरुवात होणार आहे.

              यामध्ये वडगाव येथील दौलत बाबुराव सोनवणे घर ते संजय सोनवणे घर १.०५ किलोमीटर रस्ता डांबरीकरण करणे, करंजी येथील करंजी ग्रा.मा. ७५ ते बोकटा जिल्हा हद्द ०१ किलोमीटर रस्ता डांबरीकरण करणे, वेस येथील वेस ग्रा. मा. ५२ ते जालिंदर कोल्हे घर ते बहादराबाद हद्द ०१ किलोमीटर रस्ता डांबरीकरण करणे व कोळपेवाडी येथील रा.मा. ७ ते कोळपेवाडी (ग्रा.मा. १०१) वरील दीपक ढोणे घराजवळील नाला सि.डी. वर्क करणे या सर्व कामांसाठी एकूण ८० लाख रुपये निधी दिला आहे.

या सर्वच रस्त्याच्या कामांच्या निविदा प्रक्रिया लवकरच प्रसिद्ध होवून या रस्त्यांच्या कामांना सुरुवात होणार आहे त्यामुळे वरील सर्व गावातील नागरिकांची मोठी अडचण दूर होणार आहे त्यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे. मागील काही वर्षापासून रस्ता दुरुस्तीचा प्रश्न आ. आशुतोष काळे यांनी सोडविल्यामुळे या गावातील नागरिकांनी आमदार आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे.  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here