कोपरगावमध्ये १२ उमेदवार तर शिर्डीमध्ये ८ उमेदवार निवडणूक रिंगणात …

0

कोपरगावमध्ये ७ उमेदवारांची माघार, बंडखोरी नाही , तर शिर्डीत डॉ. पिपाडांची बंडखोरी कायम

कोपरगाव : कोपरगाव विधानसभा मतदार संघातून १९ पैकी ७ उमेदवारांनी माघार घेतली . यामध्ये विजय भगत,शंकर लासुरे,बाळासाहेब जाधव, विजय वडांगळे,मनीषा कोल्हे,राजेंद्र कोल्हे,पावजी आहिरे यांनी माघार घेतली. आता कोपरगाव विधानसभेच्या रिंगणात १२ उमेदवार राहिले असून त्यामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विद्यमान आमदार आशुतोष काळे, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार पक्षाचे संदीप वर्पे , अपक्ष उमेदवार संजय काळे आदी प्रमुख उमेदवारांमध्ये लढत होणार आहे.

शिर्डी विधानसभा मतदारसंघात आज ४ उमेदवारांची माघार. तुषार गणेश सदाफळ, ममता राजेंद्र पिपाडा,जनार्दन चंद्रभान घोगरे,शितोळे सुदर्शन लक्ष्मण या चार उमेदवारांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतली . देवेंद्र फडणवीस यांच्या चार्टर प्लेन पॉलीसी नंतर ममता पिपाडा यांच्या माघारीमुळे शिर्डी मतदार संघातील भाजपातील बंडखोरी थांबणार असे वाटत असताना डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी उमेदवारी कायम ठेवल्यामुळे विद्यमान आमदार तथा महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांची दोखेदुखी कायम राहिली आहे.

१.विखे पाटील राधाकृष्ण एकनाथराव – भारतीय जनता पार्टी  ,२.प्रभावती जनार्दन घोगरे‌- इंडियन नॅशनल काँग्रेस  ,३.राजू सादिक शेख – वंचित बहुजन आघाडी ,४.मोहम्मद इसहाक इब्राहिम शाह – भारत जोडो पार्टी, ५.डॉ.पिपाडा राजेंद्र मदनलाल – अपक्ष ,६.मयुर संजय मुर्तडक – अपक्ष ,७.रेश्मा अल्ताफ शेख – अपक्ष ८.रामनाथ भाऊसाहेब सदाफळ – अपक्ष असे एकूण ८ उमेदवार रिंगणात उभे राहिले आहे.कोपरगाव मतदार संघामध्ये १९ वैध उमेदवार उभी होते त्यापैकी ७ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्याने १२ उमेदवार निवडणूक रिंगणात उभे राहिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here