कोपरगावात दोन गटात तुफान हाणामारी… 

0

कोपरगाव प्रतिनिधी : कोपरगाव शहरातील गजानन नगर भागामध्ये सोमवारी रात्री 11:30 च्या सुमारास दोन गटांमध्ये अज्ञात कारणावरून तुफान हाणामारीची घटना घडली. यामध्ये दोन्ही गटाकडून काठ्या, कोयत्याचा सर्रास वापर करण्यात आला. तसेच मोठ्या प्रमाणात दगडफेक करण्यात आली. यामध्ये चार ते पाच तरुणांना गंभीर दुखापत झाली आहे. तसेच यात एका तरुणाच्या डोक्याला धारदार शास्त्राने वार करण्यात आल्याने गंभीर जखमी झाला आहे. मात्र पोलीस ठाण्यामध्ये जाऊनही दोन्ही गटाने फिर्याद देण्यास नकार दिल्याने गुन्हा दाखल होऊ शकला नाही.

या घटनेनंतर कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात रात्री मोठा जमाव तक्रार करण्यासाठी जमला होता. मात्र काही तथाकथित गाव पुढाऱ्यांनी मध्यस्थी करत दोन्ही गटामध्ये समेट घडून आणत पोलिसांवरील कामाचा भार कमी केला. मात्र रस्त्याने चालणाऱ्या एखाद्या वाहन धारकाकडे एखादा कागद कमी असल्यावर गुन्हा दाखल करण्याची तत्परता दाखवणाऱ्या पोलीस यंत्रणेने गावाची कायदा सुव्यवस्था बिघडवणारी एव्हढी मोठी घटना घडूनही केवळ दोन्ही गात फिर्याद देण्यास तयार नसल्याचे कारण देत गुन्हा दाखल न करणे अनाकलनीय आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात दगडफेक, हत्यारांचा वापर करत वार होऊनही गुन्हा का दाखल करण्यात आला नाही हा खरा महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला जात आहे. एरवी कायदा सुव्यवस्थेच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात गुन्हे दाखल होतात मात्र यात पोलिसांनी गुन्हा दाखल का केला नाही. यात कुणाचा दबाव होता का असे एक ना अनेक प्रश्न निर्माण होत आहे.

शहरात दिवसेंदिवस होणाऱ्या दगडफेक हाणा मारी चोरीच्या घटना यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष (?)पोलीस अधीक्षक राकेश ओला आणि पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी कोपरगाव शहरातील बिघडत चाललेली कायदा सुव्यवस्था यावर लक्ष देऊन कायद्याशी खेळणाऱ्या गुन्हेगारांवर कडक कारवाई वेळीच करणे गरजेचे आहे अन्यथा पुढील काळात आजच्या या हाणामारीच्या घटनेची भविष्यात गंभीर गुन्ह्याचे स्वरूप धारण करू शकतो. आणि त्यामुळे शहरामध्ये कायदा सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here