कोळपेवाडी प्रतिनिधी – कोपरगाव तालुक्यातील काळे गटाच्या ताब्यातील कोळगाव थडी विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे व्हा.चेअरमनपदी गणेश निवृत्ती पानगव्हाणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
कोळगाव थडी विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे व्हा.चेअरमन ज्ञानदेव रोकडे यांनी रोटेशन पद्धतीनुसार आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या पदासाठी निवडणूक अधिकारी आर. एन. राहणे यांच्या उपस्थितीत निवडणूक पार पडली. या निवडणुकीत व्हा.चेअरमनपदी गणेश निवृत्ती पानगव्हाणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी चेअरमन सोमनाथ चव्हाण,संचालक मंडळाचे सदस्य रावसाहेब पानगव्हाणे, राजाराम निंबाळकर, राजेंद्र लुटे, तसेच उपसरपंच सुनील चव्हाण,कैलास लुटे,बाबासाहेब पानगव्हाणे,तुळशीराम पानगव्हाणे, शांताराम पानगव्हाणे, गोरख कोळपे, सचिव राजगुरू आदींसह सभासद उपस्थित होते. नवनिर्वाचित व्हा.चेअरमन गणेश पानगव्हाणे यांचे माजी आमदार अशोकराव काळे व आ.आशुतोष काळे यांनी अभिंनदन केले असून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.