देवळाली प्रवरा / प्रतिनीधी
राहुरी तालुका जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या क्रीडा स्पर्धेमध्ये वळण जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे विद्यार्थी चमकले आहेत. तालुका स्तरीय पार पडलेल्या विविध क्रिडा स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांना घवघवीत यश मिळाले असून अनेक विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेमध्य निवड करण्यात आली आहे. सदर यशाबद्दल विद्यार्थी तसेच शिक्षकांचे विविध स्तरातून कौतुक केले जात आहे.
शुक्रवारी राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या क्रीडा भवन मैदानामध्ये पार पडलेल्या तालुका स्तरीय क्रीडा स्पर्धेतील कबड्डी स्पर्धेत लहान गटात वळण शाळेने प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर गोळा फेक मोठा गटात ज्ञानेश्वरी हरीभाऊ खिलारी हिने प्रथम क्रमांक पटकावला आहे.तर दुसरीकडे मात्र ज्ञानेश्वरी खिलारी हिने थाळीफेक मोठ्या गटात देखील द्वितीय क्रमांक पटकावला आहे. थाळी फेक मोठ्या गटात ओम साईनाथ आगलावे याने देखील तृतीय क्रमांक मिळविला आहे. उंच उडी मोठा गटात संकेत ज्ञानेश्वर मोरे याने देखील द्वितीय क्रमांक पटकिविला आहे.तर उंच उडी मोठ्या गटात प्रणाली रावसाहेब भोगे हिने देखील द्वितीय क्रमांक पटकावला असल्याने या विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत निवड झाली आहे.
विद्यार्थ्यांना मिळालेल्या घवघवीत यशाबद्दल सरपंच सुरेश मकासरे, अशोक कुलट, एकनाथ खुळे, ज्ञानेश्वर खुळे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पञकार गोविंद फुणगे, उपाध्यक्ष आशाबाई दत्तात्रय खुळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस ना.मनोज गोसावी, उमेश खिलारी, सुनिल खुळे, कैलास बनकर, बांपुसाहेब चव्हाण, धनंजय आढाव, डाॅ. किशोर म्हस्के, रामदास कार्ले, योगेश काळे,वसंत आढाव, सोमनाथ कार्ले, विठ्ठल कार्ले,भाऊराव गोसावी आदिंसह शाळा व्यवस्थापन समितीच्या सर्व सदस्य तसेच पालकांनी विद्यार्थी तसेच शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.
शाळेच्या मुख्याध्यापिका मंजुशा जाधव, मच्छिंद्र कदम, पोपट फापाळे, कल्पना सुपेकर, वैशाली गायकवाड, मनिषा कुंभारकर, हमीद शेख, वैशाली दरेकर, दिपक येळे यांचे विद्यार्थांना मार्गदर्शन लाभले. विजयी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले जात असताना दुसरीकडे मात्र ज्या विद्यार्थ्यांची निवड झाली नाही त्यांनी देखील खचून न जाता खिलाडू वृत्तीने पुन्हा चांगला सराव करून आपल्या शाळेचे तसेच गावाचे नाव उज्वल करावे असे यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गोविंद फुणगे यांनी सांगितले.