संगमनेर : तालुक्यातील रहिमपूर येथील जागृत देवस्थान असणाऱ्या खंडोबा देवाचा यात्रोत्सव काल मंगळवारपासून सुरू झाला असून या यात्रा उत्सवाची सांगता उद्या गुरुवारी होणार आहे.
काल मंगळवारी सायंकाळी देवाच्या काठ्या आणि पालखीचा कार्यक्रम मोठ्या भक्ती भावाने संपन्न झाला. आज दिवसभर देवाला नैवेद्य दाखवण्याचा कार्यक्रम होणार असून सायंकाळी खंडोबा देवाच्या विवाहाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे, तसेच रात्री जागरण गोंधळाचा कार्यक्रम होणार असून उद्या गुरुवारी सकाळी हाज-याचा कार्यक्रम पार पडणार आहे. खंडोबा देवाचा यात्रा उत्सव असल्याने व्यवस्थापन समितीने मंदिरावर आकर्षक रोषणाई केली असून व्यवस्थापन समितीचे कार्यकर्ते हा यात्रोत्सव पार पाडण्यासाठी कष्ट घेत आहेत.