खरीप हंगाम २०२४ साठी ‘ई-पीक पाहणी’ सुरू शेतकऱ्यांना अॅप अद्ययावत करण्याचे आवाहन

0

शिर्डी,दि.२ ऑगस्ट -* सध्या खरीप हंगाम २०२४ सुरु झाला आहे. १ ऑगस्ट २०२४ पासून, शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतातील पिकांची ई-पीक पाहणी नोंद मोबाईलद्वारे सुरू करावी. राहाता तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी त्यांच्या अँड्रॉइड मोबाईलमध्ये ई-पीकपाहणी व्हर्जन 3.0.2 अॅप अद्ययावत करून नोंदणी लवकरात लवकर पूर्ण करावी. असे आवाहन महसूल प्रशासनाने केले आहे. 

मोबाईलद्वारे ई-पीक पाहणी केल्यामुळे भविष्यात नैसर्गिक आपत्ती आल्यास पिकविमा व इतर शासकीय सवलती मिळवण्यासाठी मदत होते. ऑनलाइन ई-पीकपाहणीबाबत शेतकऱ्यांना पुरेशी माहिती नसल्यामुळे महसूल पंधरवडा १ ऑगस्ट २०२४ ते १५ऑगस्ट २०२४ या कालावधीत गावचे तलाठी शेतकऱ्यांना ई-पीकपाहणी अॅप डाऊनलोड कसे करावे व वापरावे याचे प्रात्यक्षिक दाखवून मदत करणार आहेत. 

अहमदनगर प्रभारी जिल्हाधिकारी आशिष येरेकर, शिर्डी अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, उपजिल्हाधिकारी (महसूल) अतुल चोरमारे, शिर्डीचे उपविभागीय अधिकारी माणिकराव आहेर, राहाता तहसीलदार अमोल मोरे यांनी शेतकऱ्यांनी ‘ई-पीक पाहणी’ अॅप डाऊनलोड करून पीक पाहणी करावी.  शेतकऱ्यांनी काही अडचण असल्यास त्यांच्या गावातील तलाठ्याशी संपर्क साधावा. असे आवाहन ही केले आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here