संगमनेर : संगमनेर तालुक्यातील कोंची गावातील विधवा व गरजू महिलांना महाराष्ट्र अल्पसंख्यांक ख्रिस्ती विकास परिषदेच्या वतीने मदत नव्हे कर्तव्य या भावनेतून साडी व तिळगुळाचे वाटप करून मकर संक्रांतीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. यशस्वी फाउंडेशनचे अध्यक्ष व स्वच्छता दूत म्हणून ओळख असणारे आदित्य घाटगे यांच्या हस्ते महिलांना साडी वाटप करण्यात आले.
मकर संक्रांत हा सौभाग्यवती महिलांचा सण समजला जातो. कोरोना महामारीमुळे अनेक तरुण महिला विधवा झाल्या असून अशा महिलांचा सण गोड व्हावा म्हणून महाराष्ट्र अल्पसंख्यांक ख्रिस्ती विकास परिषदेचे प्रदेशाध्यक्ष अनिल भोसले यांच्या पुढाकाराने हा उपक्रम पार पडला. यावेळी महिलांच्या चेहऱ्यावर एक उत्साह दिसत होता.या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी आदित्य घाटगे, परिषदेचे तालुकाध्यक्ष प्रकाश भोसले, भोसले प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीधर भोसले, विलास शेळके, विनोद गायकवाड, सचिन सोनवणे, सुमनबाई भोसले, लता शेळके, संगीता भोसले, यशोदा यादव, संगीता माळी, ताराबाई बर्डे, शोभा पवार, आदींसह मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. या उपक्रमाचे प्रास्ताविक श्रीधर भोसले यांनी केले. तर सुमनबाई भोसले यांनी शेवटी आभार मानले.