संगमनेर : संगमनेर तालुक्यातील रहिमपूर येथील प्रगतशील शेतकरी तथा सामाजिक कार्यकर्ते विठ्ठलराव बाबुराव पा शिंदे आणि ॲड.सोमनाथ बाबुराव पा शिंदे यांच्या मातोश्री गं.भा कासुबाई बाबुराव शिंदे यांचे वयाच्या ९५ व्या वर्षी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले.
जुन्या काळात सामाजिक कार्यात हिररीने भाग घेणाऱ्या गं.भा कासुबाई बाबुराव शिंदे या धार्मिक वृत्तीच्या होत्या. त्यांना परिसरात “नानाई” या नावाने ओळखले जायचे. त्यांच्या पश्चात दोन मुले विठ्ठलराव,
ॲड.सोमनाथ,तीन मुली जयवंताबाई,राधाबाई,मंदा, तीन पुतणे, सुना,नातू ,नाती,पणतू असा मोठा परिवार आहे. पत्रकार चंद्रकांत शिंदे पाटील यांच्या त्या आजी होत्या. त्यांच्या निधनाने परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.