गुहा ता.राहुरी येथे कानिफनाथ महाराज आरतीवरून धार्मिक तणाव ; पोलिसांचा वेळीच हस्तक्षेप

0

देवळाली प्रवरा / प्रतिनिधी

                     गुहा ता.राहुरी येथे शनिवारी  आमवस्या असल्याकारणाने मढी येथिल कानिफनाथ मंदिरात न जाता गुहा येथिल कानिफनाथ महाराज यांच्या मंदिरात आरती करून महाप्रसादाचा कार्यक्रम ग्रामस्थांनी आयोजित केला होता. परंतु गावातील एका गटाने या कार्यक्रमाला विरोध दर्शवून आरती करण्यास विरोध दर्शविल्याची बातमी सर्वत्र पसरल्यामुळे मोठ्या प्रमाणावर हनुमान मंदिराच्या परिसरात ग्रामस्थ एकत्र येत आरती करणारच या भूमिकेवर ठाम राहिले. दोन्ही बाजुने ऐकमेकास विरोध होत असल्याने  तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

               पोलिस निरीक्षक घनशाम डांगे यांनी पोलिस बंदोबस्त तैनात करुन दोन्ही समाजाला समजावून सांगत गुहा गावाचे वातावरण शांत ठेवण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले. आरती करण्याच्या भूमिकेवर एका गटाने शांततेत भूमिका घेतली असतांना दुसऱ्या गटाने आक्रमक होत. विशिष्ट प्रकारच्या घोषणा देत वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न केला.तसेच महिलांना पुढे करुन आरती नंतर वाटपासाठी आणलेला प्रसाद मंदिरा पर्यंत आणण्यास मज्जाव केला.पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे होणारा मोठा अनर्थ टळला.

          शनिवार दि.21 रोजी गुहा ता. राहुरी येथे अमवस्या असल्याकारणाने मढी येथे न जाता गुहा येथेच कानिफनाथ महाराज यांच्या मंदिरात आरती करून महाप्रसादाचा कार्यक्रम ग्रामस्थांनी आयोजित केला होता. परंतु गावातीलच दुसऱ्या एका गटाने होणाऱ्या कार्यक्रमाला विरोध दर्शविला. या कार्यक्रमास विरोध दर्शविल्याने हि बातमी तालुक्यात पसरली या ठिकाणी मोठी गर्दी होण्यास सुरवात झाली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे 

                पोलिस प्रशासन व ग्रामस्थ यांच्यात सवांद घालून गुहा गावाचे वातावरण शांत ठेवण्यासाठी शिवसेनेचे राहुरी तालुका प्रमुख  देवेंद्र लांबे यांनी महत्वाची भूमिका बजावली.यावेळी बोलतांना लांबे म्हणाले कि गेल्या अनेक वर्षांपासून गुहा गावामध्ये कानिफनाथ महाराज यांची यात्रा सर्व ग्रामस्थ एकत्रित रित्या साजरी करत आलेले आहेत. कानिफनाथ महाराज यांची आरती भाविक श्रद्धेने करत असतील तर कुणालाही विरोध करण्याचे काही एक कारण नाही.अशा प्रकारे कोणी जर गावाला वेठीस धरून सामाजिक सलोखा बिघडविण्याचे काम करत असेल तर सहन करून घेतले जाणार नाही असे लांबे पा.म्हणाले.

                या प्रसंगी किरण कोळसे,मच्छिंद्र कोळसे,अनिल सौदागर,नंदू सौदागर,ऋषिकेश बांगरे,शशिकांत कोळसे,मच्छिंद्र शिंदे,अशोक उऱ्हे,रामनाथ उऱ्हे,गंगाराम चंद्रे यांनी मनोगत व्यक्त केले.

                     या प्रसंगी अड.सचिन कोळसे,अड.प्रसाद कोळसे,राजेंद्र कोळसे,अशोक लांबे,सुजित वाबळे,अविनाश ओहळ,पोपट डौले,दिपक सौदागर,शाम सौदागर,राम बर्डे,रविंद्र उऱ्हे,बाबासाहेब मांजरे,सोमनाथ कोळसे,शिवाजी सौदागर आदी शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते.

       गुहा गावात कानिफनाथ महाराज यांचे मंदिर आहे.या ठिकाणी वाद घालणारे दोन्ही समाज पुजा अर्चा करतात परंतू आज एका गटाने धार्मिक आरती व प्रसाद वाटपास विरोध केला.त्यामुळे तणाव निर्माण झाला होता.दोन्ही गटांना शांत करुन सांमजस्याने वाद मिटवून मंदिराच्या दोन्ही गटाच्या पदाधिकाऱ्यांना सायंकाळी पोलिस ठाण्यात हजर राहुन बैठक घेतली जाणार यात वाद मिटला तर ठिक आहे. नाहितर वरीष्ठांच्या आदेशा नुसार योग्य ती कारवाई करण्यात येईल असे राहुरीचे पोलिस निरीक्षक घनशाम डांगे यांनी सांगितले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here