देवळाली प्रवरा / प्रतिनिधी
राहुरी तालुक्यातील गुहा येथे कानिफनाथ मंदिरात पारायण करण्यास एका समाजाने पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल करुन विरोध केल्याने तणाव निर्माण झाला होता. पोलीसांनी सुरवातीला आडमुठे धोरणाची अंमलबजावणी केल्याने गावकरी संतप्त झाले होते.परंतू सालाबाद प्रमाणे श्रावण महिण्यात होणाऱ्या पारायणास विरोध का? असा सवाल गावकऱ्यांनी उपस्थित केल्या नंतर अखेर पोलीसांनी नऊ भाविकांना पारायण करण्यास परवानगी दिली.पोलीस बंदोबस्तात कानिफनाथ मंदिरात मंगळवार दि.18 रोजी सकाळी पारायणास सुरवात झाल्याने गुहा येथिल तणाव निवाळला आहे.
गुहा ता.राहुरी येथिल कानिफनाथ मंदिरावरुन दोन समाजात वाद निर्माण झाले आहे. दोन्ही समाज न्यायालयात गेले आहे.न्यायालयाने दोन्ही समाजाला मंदिर व परिसरात नविन उत्सव साजरे करण्यास बंदी घातली आहे.सालाबाद प्रमाणे दरवर्षी श्रावण महिण्यात कानिफनाथ मंदिरात नवनाथ महाराजांचे पारायण केले जाते. पारायण सुरु होणार असल्याची दुसऱ्या समाजाला कल्पना असल्याने त्या समाजाने पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला होता.या तक्रार अर्जावरुन राहुरी पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी सुरवातीला पारायण करण्यास विरोध केला.मंदिरात कोणालाही पारायण करता येणार नाही अशी भुमिका घेतल्याने गावकऱ्यांनमध्ये तीव्र असंतोष पसरला होता.
गुहा येथिल गावकऱ्यांनी पोलीसांना आधी येथिल परीस्थिती समजावून घ्या.असा आग्रह धरला यावेळी घटनास्थळी राहुरीचे तहसिलदार चंद्रजित रजपुत, पोलिस उपअधिक्षक डाँ.बसवराज शिवपुंजे पोलिस निरीक्षक धनंजय जाधव घटनास्थळी दाखल झाले. गावकऱ्यांच्या भावना समजावुन घेत महसुल व पोलीस प्रशासनाने नऊ भाविकांना पारायण करण्याची परवानगी दिली.न्यायालयाचा अवमान होईल असे कोणतेही नविन उपक्रम न करण्याच्या सुचना दिल्या.अखेर पोलिस बंदोबस्तात पारायणास सुरवात करण्यात आली.
पोलीसांकडे प्राप्त झालेल्या दुसऱ्या समाजातील तक्रारीची शहानिशा करण्यात येईल.तक्रारीत तथ्य आढळल्यास गुन्हे दाखल येईल असे पोलीसांनी संतप्त गावकऱ्यांना सांगितले.गावकऱ्यांनी पोलीसांची अट मान्य केली.सालाबाद प्रमाणे होणाऱ्या श्रावण महिण्यातील पारायणास सुरु झाल्याने गुहा येथिल तणाव निवाळला आहे.
स्थानिक पदाधिकाऱ्यांनी गावकऱ्यांना कोणताही अनुचित प्रकार घडणार याची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.गुहा येथे तणाव निर्माण झाल्यानंतर पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आल्याने पोलीस छावणीचे स्वरुप निर्माण होते.