डॉ. गीतांजली रायभान गायकवाड यांचा सन्मान
कोपरगाव प्रतिनिधी : शनिवार दिनांक ८ मार्च रोजी गोदावरी बायोरिफायनरीज लि. साकरवाडी व गोदावरी बायोरिफायनरीज महिला मंडळ साकरवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी गोदावरी बायोरिफायनरीज लि. चे संचालक श्री सुहास गोडगे, महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. वंदना गोडगे, उपाध्यक्षा सौ. पुष्पा विभुते, सचिव सौ. प्राजक्ता कऱ्हाळे तसेच मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.
या कार्यक्रम प्रसंगी महिला मंडळ अध्यक्षा सौ. वंदना गोडगे यांनी बोलताना जागतिक महिला दिन साजरा करण्याचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे महिला आणि पुरुषांच्या मदतीने समानता निर्माण करण्यासाठी महिलांना त्यांच्या हक्काविषयी जागरूक करणे होय असे सांगितले. आजची स्त्री पुरुष समानता हे उद्याचे उज्वल भविष्य आहे. प्रत्येक महान व्यक्तीच्या जीवनात आणि यशात स्त्रियांचा सिंहाचा वाटा आहे. त्या पुढे म्हणाल्या की, ज्याला स्त्री आई म्हणून कळाली तो जिजाऊचा शिवबा झाला, ज्याला स्त्री बहिण म्हणून कळाली तो मुक्ताई चा ज्ञानदेव झाला, ज्याला स्त्री मैत्रीण म्हणून कळाली तो राधेचा श्याम झाला आणि ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळाली तो सीतेचा राम झाला. त्यानंतर त्यांनी अनेक उदाहरणे देऊन महिला दिनाचे महत्त्व पटवून दिले.
अध्यक्ष भाषणात डॉ. कु. गितांजली गायकवाड म्हणाल्या की, कोरोना महामारीच्या काळात शैक्षणिक राजकीय आरोग्य अशा विविध क्षेत्रात महिलांचे योगदान हे प्रशासकीय आहे जिवाजी परवा न करता आरोग्य सेविका अंगणवाडी सेविका सफाई कर्मचारी सामाजिक कार्यकर्ता यांनी समाजाची सेवा केली अशा सर्व कर्तृत्वान महिलांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपणही आपल्या देशाची समाजाचे सेवा घडेल असे कार्य करण्याचे आव्हान त्यांनी यावेळी केले.
कार्यक्रमाचे प्रास्तविकातून महिला मंडळाच्या उपाध्यक्षा सौ. पुष्पा विभुते यांनी कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट केला. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिलांच्या कर्तुत्वाचा सन्मान करण्यासाठी आजच्या कार्यक्रमाचे अवचित्य साधले. जागतिक महिला दिन निमित्ताने महिलांसाठी लकी लेडी, पासिंग बॉल, संगीत खुर्ची, ग्लास गेम, सरप्राईज गेम इत्यादी विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या व विजेत्यांना पारितोषिके देण्यात आले. यावेळी सर्व महिलांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राजक्ता कऱ्हाळे यांनी केले तर सौ. सुशीला गाढे, सौ. पंचशीला मोरे, सौ. प्रियांका मोरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सदर जागतिक महिला दिन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महिला मंडळाच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.