गौतम पब्लिक स्कूलचा विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर भर – आ. आशुतोष काळे

0

गौतम पब्लिक स्कूलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी

कोळपेवाडी वार्ताहर :- कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या गौतम पब्लिक स्कूल मध्ये भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी आ. आशुतोष काळे यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगीगौतम पब्लिक स्कूल मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांशी व त्यांच्या पालकांशी त्यांनी संवाद साधला

यावेळी आ. आशुतोष काळे म्हणाले की, कर्मवीर शंकररावजी काळे साहेबांनी शेतकऱ्यांच्या मुलांना शहरातील इंग्रजी माध्यमातील शाळांप्रमाणे इग्रजी माध्यमातून शिक्षण मिळावे या उद्देशातून कोळपेवाडी सारख्या ग्रामीण भागात गौतम पब्लिक स्कूल केले.तेव्हापासून आजतागायत विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर भर दिला जात आहे. गौतम पब्लिक स्कूल अल्प फी घेवून शिक्षण देणारी संस्था आहे. त्यामुळे भरमसाठ फी भरून देखील जी गुणवत्ता विद्यार्थ्याला मिळत नाही ती गुणवत्ता गौतम पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्याला मिळत असल्यामुळे दरवर्षी प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थी मोठ्या संख्येने येत असतात. परंतु प्रवेश मर्यादित असल्यामुळे क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना प्रवेश देवून गुणवत्तेशी कधी तडजोड केली जात नाही. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांचे ५ वी ते १० च्या वर्गात प्रवेश होवू शकले नाही त्या विद्यार्थ्यांनी व पालकांनी नाराज होवू नये. पुढील वर्षी लवकरात लवकर शाळेशी संपर्क  करून प्रवेश घ्यावा असे आवाहन केले.

यावेळी पालकांनी गौतम पब्लिक स्कूलविषयी आपल्या प्रतिक्रया व्यक्त करतांना सांगितले की, गौतम पब्लिक स्कूल ने आजपर्यंत कधीही जाहिरातबाजीवर भर न देता विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर भर दिला आहे त्यामुळे जाहिरात न करता देखील गौतम पब्लिक स्कूल मध्ये मिळणाऱ्या दर्जेदार शिक्षणाची महती सर्वत्र पसरली असल्यामुळे प्रत्येक विद्यार्थी व त्याच्या पालकांना गौतम पब्लिक स्कूलमध्ये शिक्षणासाठी प्रवेश घेण्याची इच्छा असल्याचे सांगितले.

यावेळी शाळेचे प्राचार्य नूर शेख यांनी शाळेच्या प्रवेशा विषयी माहिती देतांना सांगितले की, २०२३-२४ मध्ये गौतम पब्लिक स्कूल मध्ये घेण्यात आलेल्या प्रवेश परीक्षेला महाराष्ट्रभरातून विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. या प्रवेश परीक्षेतून ५ वी ते १० वीचे सर्व प्रवेश पूर्ण झाले असून १ ली ते ४ थीच्या प्रवेशासाठी लवकरात लवकर संपर्क साधावा असे आवाहन केले. यावेळी गौतम बँकेचे संचालक सुधाकर दंडवते, कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीचे माजी विश्वस्त वसंतराव दंडवते, प्राचार्य नुर शेख आदी मान्यवरांसह  सर्व शिक्षक, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here