गौतम युरोकिड्सचे पदवी प्रदान व वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

0

कोळपेवाडी वार्ताहर :- कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटी संचलित गौतम पब्लिक स्कूलच्या युरोकिड्स विभागातील विद्यार्थ्यांचे पदवी प्रदान व वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न पार पडले.पालकांच्या आग्रहास्तव शैक्षणिक वर्ष २०१९-२० पासून गौतम पब्लिक स्कूलमध्ये संस्थेच्या सचिव मा.सौ.चैतालीताई काळे यांच्या संकल्पनेने युरोकिड्स यांचे फ्रन्चाईसी मार्फत ३ ते ६  वर्षे वयोगटातील लहान मुलांकरीता भविष्यातील शैक्षणिक गुणवत्तेचा विचार करता लहान मुलांचा पाया मजबूत करण्यासाठी इंटरनॅशनल बोर्डचे प्री-स्कूल सुरू करण्यात आले यास पालकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे.

पदवी प्रदान व वार्षिक स्नेहसंमेलनाचे प्रमुख अतिथी म्हणून गौतम पब्लिक स्कूलचे प्राचार्य नूर शेख होते. यावेळी आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलताना त्यांनी सांगितले की, युरोकिड्सच्या तीन वर्षामध्येच लहान मुले चांगल्या प्रकारे इंग्लिश, हिंदी व मराठी भाषेचे ज्ञान ग्रहण करून उत्तमरीत्या इंग्रजी बोलतात. त्याच बरोबर भाषण कौशल्य, नृत्य, नाटिका,  संभाषण, सूत्रसंचालन आदी कौशल्य अगदी सहजपणे आत्मसात करत आहेत. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ हे ३ एप्रिल २०२५ पासून सुरु होत आहे. यामध्ये या शैक्षणिक वर्षापासून इंग्लिश, हिंदी, मराठी, गणित, विज्ञान या विषया व्यतिरिक्त नवीन हावर्ड विद्यापीठावर आधारित अभ्यासक्रमनुसार अतिरिक्त विषय-कला आणि हस्तकला, मराठी स्वर, प्री ॲबॅकस, संगणक परिचय याचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे निकष आधारित-आध्यात्मिक बौद्धिक, सर्जनशील विकास होण्यास उपयुक्त होईल. अगदी माफक फी मध्ये ग्रामीण भागात उत्तमदर्जाचे प्री-स्कूल असून याचा पालकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ करिता नवीन प्रवेश मर्यादित असून दि.२५ मार्च २०२५ पर्यंत आपल्या पाल्याचा प्रवेश घ्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.    

 पदवीप्रदान व वार्षिक स्नेहसंमेलनाकरिता विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पदवीप्रदान सभारंभ प्राचार्य नूर शेख यांचे हस्ते करण्यात आले. सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये युरोकिड्सच्या कलाकारांनी आपले नृत्यविष्कार सादर करून उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी युरोकिड्सच्या विद्यार्थ्यांना युरोकिड्स इन्चार्ज अर्चना कदम तसेच युरोकिड्स विभागाच्या सर्व शिक्षिका यांचे मार्गदर्शन लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here