अमर मोबाईल शॉपचे मॅनेजर सागर कोळी व प्रोपायटर अमर केंद्रे यांच्यावर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची जनतेनी केली होती मागणी.
उरण दि १३(विठ्ठल ममताबादे ) : अजय विजय पाटील वय ४४ केगाव दांडा, ता. उरण जि. रायगड, दीपक अशोक मोरे वय ३६ गणेशनगर उरण करंजा रोड ता. उरण जि. रायगड, रुपाली शैलेश किल्लेकर वय ३७ वर्षे रा डाऊरनगर ता. उरण, जि. रायगड, सागर शरद वाघमारे वय ३१ वर्षे रा. डाऊरनगर ता. उरण जि. रायगड, अनिल राजाराम घुटुकडे वय ३६ फुंडे बोकडविरा, ता. उरण जि. रायगड, जितेंद्र नारायण थळे, वय ४३ मुळेखंड ता. उरण, जि. रायगड. हे उरण मधील रहिवाशी तसेच इतर अनेक रहिवाशी यांची लोनच्या (कर्जाच्या )आर्थिक प्रकरणात अमर मोबाईल शॉपचे मॅनेजर सागर कोळी व प्रोपायटर अमर केंद्रे यांनी फसवणूक केली असून वरील सर्व पीडित व्यक्तींनी एकत्र येत उरण तालुक्यातील उरण पोलीस स्टेशन मध्ये संबंधित फसवणूक करणाऱ्या अमर मोबाईल शॉपचे मॅनेजर सागर कोळी व प्रोपायटर अमर केंद्रे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती.
शकडो ग्राहकांची करोडो रुपयांची ही फसवणूक झाल्याचे या प्रकरणातून समोर आले आहे. त्यामुळे या उरण मधील नवीन आर्थिक फसवणूक प्रकरणामुळे उरण मध्ये एकच खळबळ माजली आहे.अनेक महिने झाले अमर केंद्रे हा फरार होता. मात्र जागरूक नागरिक व पीडित फसवणूक झालेल्या नागरिकांनी या अन्याया विरोधात वेळोवेळी आवाज उठविल्याने अमर केंद्रे याला अटक करण्यात आली आहे.नागरिकांची फसवणूक केल्याने अमर केंद्रे यांच्यावर २० जून २०२४ रोजी उरण पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.तेंव्हा पासून अमर केंद्रे फरार होता मात्र गुरुवार दिनांक १२ सप्टेंबर २०२४ रोजी रात्री ८:३० वाजता अमर केंद्रे याला अटक करण्यात आली आहे. सध्या अमर केंद्रे सध्या तुरुंगात आहे.अमर केंद्रे यांना कोर्टात हजर केले असून १८ तारखे पर्यंत त्याला पोलीस कोठडी देण्यात आली आहे. अशी माहिती उरण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी महादेव हुलगे यांनी दिली आहे.
अजय विजय पाटील,दीपक अशोक मोरे,रुपाली शैलेश किल्लेकर, सागर शरद वाघमारे,अनिल राजाराम घुटुकडे,जितेंद्र नारायण थळे हे अर्जदार (तक्रारदार )हे उरण येथील कायमस्वरुपी रहिवाशी असुन हे ग्राहक अमर ग्लोबल मोबाईल शॉप, पत्ता कामठा रोड, उरण शहर , ता. उरण, जि. रायगड, येथील मॅनेजर सागर कोळी व प्रोप्रायटर अमर केंद्रे यांच्या शॉपमध्ये वारंवार खरेदीविक्री करण्यासाठी जात असल्यामुळे त्यांच्यासोबत सदर ग्राहकांची ओळख झाली होती. त्यानंतर अमर ग्लोबल मोबाईल शॉप येथील मॅनेजर सागर कोळी हयाने सदर नागरिकांना वेगवेगळ्या तारखेला बोलावून,त्यांना त्यांचे नावे लोन काढण्यासाठी ऑफर दिली व त्यापासुन त्यांना कौटुंबिक खर्चासाठी मदत म्हणुन फायदे मिळतील असे मॅनेजर व प्रोपायटर यांनी ग्राहकांना आमिष दाखविले. तसेच प्रोप्रायटर अमर केंद्रे यांनी सदर लोनबाबत ग्राहकांना आश्वासन दिल्यामुळे ग्राहकांनी मॅनेजर सागर कोळी यांच्या शब्दांवर पुर्णपणे विश्वास ठेवला. ग्राहकांना देखील कौटुंबिक व मुलांच्या खर्चासाठी मदत मिळणार म्हणुन ग्राहकांनी अमर शॉपच्या मॅनेजर व प्रोपायटर यांना लोन काढण्यासाठी परवानगी दिली.तसेच सदर लोनचे हफ्ते मॅनेजर सागर कोळी हा भरणा करेल असे त्यांनी ग्राहकांना सांगितले होते. त्यावेळी प्रोप्रायटर अमर केंद्रे हयानेदेखील सदर लोन बाबत ग्राहकांना तुम्ही लोनचे हप्ते भरू नका आम्ही सर्व लोनचे हप्ते भरू असे आश्वासन देवून गॅरंटी दिली होती. त्यानंतर मॅनेजर सागर कोळी हयाने ग्राहकांच्या नावाने ऑनलाईन लोन काढले आहे.असे प्रकार शेकडो नागरिकांच्या बाबतीत घडले.परंतु मागील काही महिन्यांपासुन अमर ग्लोबल मोबाईल शॉप येथील मॅनेजर सागर कोळी याने ग्राहकांच्या नावाने लोन काढले असुन सदर लोनच्या हफ्त्याची रक्कम त्याने भरलेली नाही. त्यामुळे ग्राहकांना सदर प्रकरणाचा मोठया प्रमाणामध्ये आर्थिक नुकसान सहन करावा लागत आहे. तसेच सदर लोनसाठी आश्वासन देवून, अमर ग्लोबल मोबाईल शॉप येथील प्रोप्रायटर अमर केंद्रे याने शेकडो सामान्य नागरीकांची / ग्राहकांची फसवणुक करुन करोडो रुपयाची अफरातफर करुन फरार झाला आहे. अमर ग्लोबल मोबाईल शॉप येथील मॅनेजर सागर कोळी व प्रोप्रायटर अमर केंद्रे हयांनी ग्राहकांचा विश्वासघात करुन अनेक सर्वसामान्य ग्राहकांची पुर्णपणे फसवणुक केली आहे.त्यांच्या फसवणुकीमुळे ग्राहकांना खुप मोठया प्रमाणामध्ये आर्थिक नुकसान सहन करावा लागला आहे.तक्रार दारांनी नोंदविलेल्या तक्रार व पुरावे सादर केल्यानंतर पोलीस प्रशासनाने प्रोप्रायटर अमर केंद्रे हयांच्याविरुध्द कायदेशिर कार्यवाही केली आहे. फसवणूक झालेल्या ग्राहकांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी अजय विजय पाटील,दीपक अशोक मोरे, रुपाली शैलेश किल्लेकर,सागर शरद वाघमारे, अनिल राजाराम घुटुकडे, जितेंद्र नारायण थळे तसेच अनेक तक्रार दारांनी पोलीस प्रशासनाकडे केली आहे.
नागरिकांना फसवून अमर केंद्रे व सागर कोळी यांनी ग्राहकांना मोबाईल दिले म्हणून बँकेला कळविले व ग्राहकांच्या नावावर लोन केले. नंतर बँकेने लोन घेतले आता लोन फेडा हप्ते भरा असा तगादा बँकेने ग्राहकांच्या पाठीमागे लावला. नाईलाजाने फसवणूक झालेल्या नागरिकांना विनाकारण खोट्या लोनचे पैसे बँकेत भरावे लागले आहे.हप्ते भरावे लागले.या सर्व घटनेला अमर मोबाईल शॉपचे प्रोपायटर अमर केंद्रे व मॅनेजर सागर कोळी जबाबदार आहे. या दोघांवर शासनाने कठोरात कठोर शिक्षा करावे. बँकेचे सर्व लोन माफ करून ग्राहकांनी भरलेले हप्ते नागरिकांना परत करावेत. व फसवणूक झालेल्या नागरिकांना न्याय द्यावा.
– अजय विजय पाटील.पीडित व्यक्ती, फसवणूक झालेली व्यक्ती, उरण