देवळाली प्रवरा / प्रतिनिधी :
पत्नीच्या चारीत्र्यावर संशय घेवून आरोपी पतीने पत्नीला शिवीगाळ करुन लाथा बूक्क्यांनी मारहाण केली. तसेच चाकूने वार करून जखमी केल्याची घटना दि. १४ जूलै २०२४ रोजी राहुरी तालूक्यातील वांबोरी येथे घडली. या घटनेतील ४५ वर्षीय महिला ही राहुरी तालूक्यातील खंडाबे खुर्द येथील रहीवाशी असून सध्या त्या वांबोरी येथे राहतात. त्यांचा पती त्यांना नेहमीच दारु पिऊन घरगुती कारणावरुन मारहान करत असतो.
दि. १४ जूलै २०२४ रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास पत्नी घरात असताना आरोपी पती दारु पिऊन घरी आला व पत्नीला म्हणाला की, तु कुठे गेली होती. मला सांग असे म्हणुन त्याने पत्नीवर संशय घेउन शिवीगाळ करुन लाथा बुक्क्याने मारहान केली. तसेच पत्नीवर चाकूने वार करून मुलाला कुदळीच्या दांड्याने मारहाण केली. आणि पत्नीला जीवे मारण्याची धमकी दिली. घटनेनंतर पत्नीने राहुरी पोलिस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून आरोपी पती विरोधात गून्हा रजि. नं. ८१३/२०२४ भारतीय न्याय संहिता कलम ११५ (२), ११८ (१), ३५१ (२), ३५१ (३), ३५२ प्रमाणे गून्हा दाखल करण्यात आला.