वारी परंपरेबद्दल अभिमान बाळगत नगरकरांचा चैत्र शोभायात्रेस उत्स्फूर्त प्रतिसाद
नगर – गुढीपाडवा म्हणजे मराठी नवीन वर्षाची सुरुवात सलग तिसर्या वर्षी नगरकरांनी चैत्र शोभायात्रेमध्ये उस्फूर्त सहभाग घेत आपल्या वारी परंपरेबद्दल अभिमान बाळगत वारकर्यांच्या या शोभायात्रेत उत्स्फुर्त सहभाग घेतला. पहाटे सहा वाजता सर्व नगरकर प्रोफेसर कॉलनी चौकात जमले. गणांत प्रतिष्ठानच्या ढोल पथकाने या चैत्र शोभा यात्रेची सुरुवात झाली. पुढे गुलमोहर रोड मार्गे एकविरा चौका जवळ सांदिपनी अकॅडमीच्या परिसरात या चैत्र शोभा यात्रेची सांगता झाली. या कार्यक्रमात गुरुमाऊली संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी रामाष्टक आणि विठ्ठलाच्या नाम गजरात नृत्य सादर केलं. तसेच एम.एम.वाय.टी.सी. यांनी योगा आणि मल्लखांब प्रात्यक्षिके केली केली. यावर्षी ’संतसृष्टी’ ही थीम घेऊन ही चैत्र शोभायात्रा नगरकरांनी यशस्वी केली.
अहमदनगर मधील अनेक संस्थांनी स्वयंस्फूर्तीने या शोभायात्रेत सहभाग नोंदवला. यात इम्प्रेस बायकर्स, भारत भारती, चौपाटी कारंजा मित्र मंडळ, वृद्धेश्वर अर्बन, दत्त योगीराज आश्रम मुळेवाडी, बालरंग भूमी परिषद, अहमदनगर, इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया अहमदनगर ब्रांच, स्नायडर इलेक्ट्रिक, झुलेलाल ग्रुप, श्रावणसखी, मोरया मॅार्निंग क्लब, स्वानंदी हास्य क्लब , एस जे के ब्युटी अकॅडमी, नगर जल्लोष, संस्कार भारती, तुकाराम व्हॅन, ट्रेक कॅम्प, आर्ट अॅाफ लिव्हींग, विधी सेवा,प्राधिकरण,निमा, मैत्री कट्टा, मेहेरबाबा सेंटर, अनाम प्रेम, राजमुद्रा कॅडमी, सर्व रोटरी क्लब, अहमदनगर, सायकलिस्ट असोसिएशन, राजस्व हॉर्स रायडिंग क्लब सहभागी झाले होते.
या कार्यक्रमात रेडिओ सिटी च्या टीम सोबत वृद्धेश्वर अर्बन मल्टीस्टेटचे अजय गावडे, मेघना वाडगे-गावडे, आर के इंटिरियर चे डॉ नितीन कुंकूलोळ , सांदिपनी अकॅडमीचे डॉ.के.बालराजू उपस्थित होते.
रंग संस्कृती या ग्रुपने प्रोफेसर कॉलनी चौक येथे भव्य आणि सुरेख रांगोळी रेखाटली होती. जी चैत्र शोभा यात्रेचं विशेष आकर्षण ठरली. तिरंगा फाउंडेशन ने या शोभायात्रेस उत्तम सहकार्य केले. योग योगेश्वर जय शंकर या मालिकेतील शंकर महाराजांची भूमिका निभावणारा नगरचा कलाकार आरुष बेडेकर देखील या चैत्र शोभायात्रेत सहभागी झाला होता. घर घर लंघर या सेवाभावी संस्थेने तसेच गोविंद जोशी बन्सीमहाराज यांनीदेखील अन्नदानाचे मौलिक सहकार्य याप्रसंगी केले.
या चैत्र शोभायात्रेत स्नायडर इलेक्ट्रिक चे अरविंद पारगावकर, चित्रकार तथा शिल्पकार प्रमोद कांबळे, डॉ.प्रकाश कांकरिया डॉक्टर सुधा कांकरिया यांसोबत बरेच मान्यवर सहभागी झाले होते.
या कार्यक्रमासाठी चैत्राली जावळे, प्रसन्न पाठक, धनेश खत्ती, सचिन जगताप, नितीन जावळे, शौनक मुळे, आकांक्षा गायकवाड, पिपिलिकेश्वर जाधव, प्रसाद भणगे, कल्पना सावंत, प्रसाद बेडेकर, यांच्या ज्ञानेश शिंदे, विशाल लिंबे, संदीप गुंड यांनी परिश्रम घेतले.