देवळाली प्रवरा /प्रतिनिधी
येथिल श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी अहमदनगर जिल्हा पावसाळी क्रीडा स्पर्धा सन 2022-23 मध्ये विविध क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले आहे. यावर्षी 277 खेळाडूंनी तालुका स्पर्धेत सहभाग घेतला.त्यापैकी 130 खेळाडूंची जिल्हा स्तरावर निवड झाली. तर 27 खेळाडूंची विभागास्तरावर निवड झाली. 13 संघ जिल्ह्यासाठी खेळले आहेत त्यात 3 संघाची विभागास्तरावर निवड झाली आहे. अहमदनगर जिल्हयाकडून पुणे विभागीय शुटिंग बॉल स्पर्धेत 19 वर्षे मुलांचा संघ प्रथम क्रमांकाने तर 19 वर्षे वयोगट मुलींचा संघ द्वितीय क्रमांकाने विजयी झाला. शुटींग बाँल स्पर्धेतील मुलांची राज्यपातळीवर निवड करण्यात आली आहे.प्रज्ञा गडाख हिने शुटिंग बॉल नॅशनल खेळाडू म्हणून महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व केले. यावर्षीची शुटिंग बॉल स्पर्धेत महाराष्ट्राचा संघ विजयी झाला.हे सामने मध्यप्रदेश मधील जलती नॅशनल गेम्स येथे पार पडले आहे.
देवळाली प्रवरा येथिल श्री.छञपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या 19 वर्ष वयोगट मुलांनी खो खो स्पर्धेत तालुक्यात प्रथम क्रमांकाने विजयी मिळविला.14 वर्ष वयोगट मुले खो खो स्पर्धेत तालुक्यात दुसरा क्रमांक मिळविला आहे. कब्बडी स्पर्धेत 19 वर्ष वयोगटाच्या मुलांनी तालुक्यात प्रथम क्रमांका ने विजयी मिळवून जिल्ह्यास्तरावर या संघाची निवड करण्यात आली आहे.कब्बडी स्पर्धेत 17 वर्ष वयोगट मुलांनी तालुक्यात प्रथम क्रमांकाने बाजी मारुन जिल्ह्यास्तरावर निवड करण्यात आली.ब्याडमिंटन स्पर्धेत 19 वर्ष वयोगटाच्या मुली जिल्हा स्थरावर सहभाग नोंदविला. 17 वर्ष वयोगटातील मुले प्रथम क्रमांकाने कब्बडी स्पर्धेमध्ये विजयी जिल्हा स्तरावर निवड करण्यातआली.19 वर्ष वयोगटातील मुले कब्बडी स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाने विजयी तर 17 वर्षवयोगटातील संघाने फायनल मध्ये प्रवेश केला आहे.19 वर्ष वयोगटातील खो खो स्पर्धेत प्रथम क्रमांकाने विजयी.14 वर्ष वयोगटातील खो खो स्पर्धेत द्वितीय क्रमांकाने राहुरी तालुका संघात वीजयी.19 वर्ष वयोगट शुटिंग बॉल मुले जिल्ह्यात प्रथम क्रमांक विभागाला संघाची निवड करण्यात आली संघाच्या कर्णधार प्रथमेश थोरात याची निवड करण्यात आली.19 वर्ष वयोगट शूटिंग बॉल स्पर्धेत मुली जिल्ह्यात प्रथम क्रमांक तर विभाग स्थरावर संघाची निवड करण्यात येवून कर्णधारपदी प्रज्ञा गडाख हिची निवड करण्यात आली.
राहता तालुक्यातील सावित्रीबाई फुले महाविद्यालय दाढ येथे या स्पर्धा पार पडल्या.शुटिंग बॉल नॅशनल खेळाडू म्हणून महाराष्ट्राचे प्रज्ञा गडाख प्रतिनिधीत्व केलं.महाराष्ट्राचा संघ शुटिंग बॉल स्पर्धेत विजयी झाला.हि स्पर्धा मध्यप्रदेश मधील जलती नॅशनल गेम्स येथे पार पडली.बॉल बॅडमिंटन स्पर्धेत 19 वर्षे वयोगट एक विद्यार्थिनी व एक विद्यार्थ्यांची विभागीय स्तरावर निवड झाली आहे.अहमदनगर जिल्हा पावसाळी क्रीडा स्पर्धेत 19 वर्ष वयोगटातील भाला फेक मध्ये विद्यार्थिनी ऋतुजा शरद गायकवाड जिल्ह्यात प्रथम क्रमांकाने विजयी झाली पुणे विभागासाठी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे.बॉल ब्याडमिंटन स्पर्धेत 19 वर्ष मुलांच्या संघाची विभागीयस्तरावर निवड झाली आहे.
श्री.छञपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी पावसाळी क्रीडा स्पर्धेत सहभागी होवून मोठे यश संपादन केले आहे. यावर्षी 277 खेळाडू तालुका स्पर्धेत सहभाग घेतला.त्यापैकी 130 खेळाडूंची जिल्हा स्तरावर निवड झाली. 27 खेळाडूंची विभागास्तरावर निवड झाली. 13 टीम जिल्ह्यासाठी खेळल्या त्यात 3 टीमची विभागास्तरावर निवड झाली आहे.येथिल विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी या वर्षीच्या क्रीडा स्पर्धेत यश संपादन केले आहे.
विद्यालयातील विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक प्रा.गणेश भांड, प्रा.राजेंद्र कुळधरण यांचे मार्गदर्शन लाभले आहे.तर यशस्वी विद्यार्थ्यांचे प्राचार्य बाबासाहेब चव्हाण, उपप्राचार्य सुधाकर आल्हाट पर्यवेक्षक नानासाहेब काळे,डि.एम सोनटक्के, राजेंद्र भालेकर,सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी यशस्वी खेडाळूंचे अभिनंदन केले.