राहत्या घरातील नायलॉन दोरीने गळफास घेऊन केली आत्महत्या
जामखेड तालुका प्रतिनिधी – जामखेड शहरालगतच नगरपरिषद हद्दीतील जमादारवाडी येथील युवराज बाळासाहेब आजबे या तरूणाने राहत्या घरातील अँगलला नायलॉन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
या बाबत सविस्तर माहिती असे की जामखेड नगरपरिषद हद्दीतील जमदारवाडी येथील रिक्षा चालक विठ्ठल बाळासाहेब आजबे यांना त्यांच्या पत्नीने फोनवर दिलेल्या माहितीनुसार विठ्ठल आजबे हे घरी गेले असता आपला भाऊ युवराज याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघड झाले. यावरून त्यांनी जामखेड पोलीस स्टेशनला संपर्क साधला असता जामखेड पोलीस घटनास्थळी दाखल झाले तसेच मृतदेह जामखेड येथील ग्रामीण रुग्णालयात आणून व शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मृतदेहावर अंतिम संस्कार करण्यात आले आहेत.
या घटनेतील खबर देणार मयत युवराज याचे भाऊ विठ्ठल बाळासाहेब आजबे यांचे जमादारवाडी येथील राहते घरात दि. ९ फेब्रुवारी रोजी ६: ३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. या बाबत जामखेड पोलीसांत आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून या घटनेचा पुढील तपास जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ना. ज्ञानदेव भागवत हे करत आहेत.