जय संघर्ष चालक-मालक सामाजिक संस्थेच्या कोपरगाव तालुका अध्यक्षपदी गोर्डे तर सचिवपदी पवार यांची नियुक्ती

0

कोपरगाव : कोपरगाव तालुका जय संघर्ष चालक-मालक सामाजिक संस्थेच्या अध्यक्षपदी निलेश गोर्डे यांची बिनविरोध निवड झाली तर सचिवपदी जेऊर कुंभारी येथील सतीश पवार यांची वर्णी लागली. तर उपाध्यक्ष पदाची माळ प्रकाश मरळ यांच्या गळ्यात पडली.जय संघर्ष संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय हळनोर, संस्थापक उपाध्यक्ष संतोष काळवणे यांच्या आदेशाने या निवडी करण्यात आल्या.

अहमदनगर जिल्हा कोअर कमिटी मेंबर/उत्तर अहमदनगर जिल्हा अध्यक्ष सलिम बिनसाद.उत्तर अहमदनगर जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत कवडे उत्तर अहमदनगर जिल्हा सचिव सचिन कवरे,अहमदनगर जिल्हा ग्रामीण अध्यक्ष मिलिंद खंडवे.यांच्या मार्गदर्शनाखाली या निवडी करण्यात आल्या. निवडीनंतर अध्यक्ष उपाध्यक्ष व सचिव यांचा सत्कार करण्यात आला. जय संघर्ष चालक-मालक सामाजिक संघटनेच्या वतीने काम करताना वरिष्ठ पातळीवर जे आदेश येतील त्याप्रमाणे काम केले जाईल असे यावेळी सत्कार करताना पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here