जिल्हा बँकेची ८८ टक्के कर्ज वसुली देत संगमनेर तालुका जिल्ह्यात प्रथम

0

संगमनेर  : काँग्रेसचे विधिमंडळ गटनेतेे तथा राज्याचे माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारातून समृद्धी निर्माण करत विकासाचे मॉडेल ठरलेल्या संगमनेर तालुक्याने यंदाही सेवा सोसायटीमध्ये आपल्या कर्जफेडीची आदर्श परंपरा कायम ठेवत दि.३१ मार्च २०२३ अखेर ८८ टक्के इतकी वसुली देत जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला असल्याची माहिती तालुका विकास अधिकारी अशोक थोरात यांनी दिली.
           सहकार हे गोरगरिबांच्या विकासाचे महत्त्वपूर्ण माध्यम आहे. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या आदर्श तत्त्वांवर संगमनेर तालुक्याने सहकारातून समृद्धी निर्माण केली असून माजी मंत्री आ.बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुका हा विकासातून सर्व क्षेत्रात अग्रभागी राहिला आहे. अहमदनगर जिल्हा सहकारी बँक ही जिल्ह्याची आर्थिक कामधेनू असून सेवा सोसायटींच्या माध्यमातून शेतकरी ,गोरगरीब यांना बँकेने सातत्याने कर्ज पुरवठा केला आहे. या बँकेवर जिल्ह्यातील सर्व सभासद, ठेवीदार ,शेतकरी यांचा मोठा विश्वास आहे. संगमनेर तालुक्याने आपल्या कर्जफेडीची उज्वल परंपरा कायम ठेवत तालुक्यातील ५७ सेवा सोसायटी यांची बँक पातळीवर शंभर टक्के वसुली दिली आहे.तसेच २७७ कोटी ७५ लाख कर्जापैकी २४३ कोटी ५ लाख रुपये इतका वसूल होऊन तालुक्याची वसुली ८८ टक्के राहिली असून अहमदनगर जिल्ह्यात संगमनेर तालुक्याचा कर्ज वसुली मध्ये प्रथम क्रमांक आला आहे.
या कर्ज वसुलीसाठी शेतकऱ्यांमध्ये सातत्याने प्रबोधन करताना आमदार बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ.सुधीर तांबे, इंद्रजीत थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बँकेचे व्हाईस चेअरमन ॲड. माधवराव कानवडे , संचालक गणपतराव सांगळे, जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे,संगमनेर तालुक्याचे तालुका विकास अधिकारी अशोक थोरात, विशेष वसुली अधिकारी  उल्हास शिंदे तसेच संगमनेर तालुक्याचे तालुका सचिव  प्रकाश कडलग यांचे सह विविध पदाधिकाऱ्यांनी गावोगावी सातत्याने बैठका घेऊन कर्ज वसुलीसाठी विशेष परिश्रम घेतले. त्यामुळे तालुक्याची कर्ज वसुली मोठ्या प्रमाणात होऊ शकली.या सर्व वसुली कामांमध्ये तालुक्यातील सर्व सेवा सोसायटीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक मंडळ, सचिव बंधू, जिल्हा बँकेचे शाखाधिकारी, अधिकारी व कर्मचारी वर्ग यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना ,संगमनेर तालुका दूध संघ, शेतकी संघ, मार्केट कमिटी या संस्थांनी ही कर्जदार शेतकऱ्यांना वसुली करण्यासाठी मोलाचे सहकार्य केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here