डॉ.विठ्ठलराव विखे पाटील अभियांत्रिकीतील विद्यार्थ्यांचे सरकारी परीक्षेत यश

0

नगर – विळद घाट येथील डॉ. विठ्ठलराव विखे पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातील स्थापत्य अभियांत्रिकी विभागातील एकुण 19 विद्यार्थ्यांची सरकारी क्षेत्रात निवड झालेली आहे.     

     अलिकडेच नगर रचना विभागात व सार्वजनिक बांधकाम विभाग, जलसंपदा विभाग तसेच महानगरपालिका इ. परीक्षांचा निकाल जाहिर झाला असून यामध्ये डॉ.विखे अभियांत्रिकीतील 19 विद्यार्थ्यांची अधिकारी म्हणून निवड झाली आहे. यामध्ये विश्‍वजीत कोहकडे, सुकन्या रोकडे, प्रणाली औटी, व्यंकटेश संगनवार, प्रतिक कराळे, अक्षता जाधव, विक्रांत लांडगे, विश्‍वजीत औटी, प्रकाश पालवे, रोहिणी दरेकर, अश्‍विनी खरात, पंकज पालवे, विश्‍वास उगले, रामेश्‍वर पारवे, अक्षदा साबळे, दुर्गा तनपुरे, रविराज हारेर, दिपक तोडमल व प्रतिक दळवी यांचा समावेश आहे. तसेच दोन विद्यार्थी विनय डोंगरे व अक्षय मुनोत हे गेट परीक्षेत उत्तीर्ण झाले.

     डॉ.विखे पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाला नॅशनल असेसमेंट अ‍ॅण्ड अ‍ॅकीडिटेशन कौन्सील ये ‘ए’ प्लस मानांकन असून येथील स्थापत्य अभियांत्रिकी विभाग हा एन.बी.ए.न्यू दिल्ली मानांकित आहे. या विभागामधून बर्‍याच कंपन्यांशी करार केलेला असून स्पर्धा परीक्षांमध्येही विद्यार्थी मोठ्या प्रमाणात यश मिळवत आहेत.

     या यशाबद्दल फौंडेशनचे डेप्युटी डायरेक्टर (टेक्निकल) प्रा. सुनिल कल्हापुरे व प्राचार्य डॉ.उदय नाईक, विभागप्रमुख डॉ. उर्मिला कवडे, प्राध्यापकांनी सर्वांचे हार्दिक अभिनंदन करुन त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

     यासर्व विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन  ना.डॉ.राधाकृष्ण विखे पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी माजी खा.डॉ.सुजय विखे पाटील, सेक्रेटरी जनरल डॉ.पी.एम. गायकवाड यांनी देखील त्यांच्या उज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा देवून कौतुक केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here