नगर – अखिल भारतीय व्यवसाय परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून विळद घाट येथील डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फौडेशनच्या औद्योगिक प्रशिक्षण केंद्राचा (आय.टी. आय.) चा सरासरी 89 टक्के निकाल लागला. यामधील इलेक्ट्रिशियन, ड्रॉफ्ट्समन मेकॅ निकल, वायरमन व वेल्डर या विभागांचा शंभर टक्के निकाल लागला, अशी माहिती प्राचार्य ए.व्ही. सूर्यवंशी यांनी दिली.
ट्रेडनिहाय प्रथम आलेले प्रशिक्षणार्थी पुढीलप्रमाणे – इलेक्ट्रिशियन- समाधान नागरगोजे व सुशांत जोशी, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅ निक- निलेश पालवे, फिटर- ओंकार पालवे, वायरमन- विशाल खेडकर व योगेश नागरगोजे, टर्नर – अशोक बरकडे, मेकॅनिक मोटार व्हेईकल – रामेश्वर चापे, डॉफ्टसमन मेकॅनिकल – शुभम जाधव, मशिनिस्ट- नंदकिशोर वायकर, मेकॅ निक आर.ए.सी.- शशिकांत उदरे, वेल्डर – दिनेश थोरात, डिझेल मेकॅ निक-दिनेश पाडळे, कॉम्प्युटर ऑपरेटर व प्रोग्रामिंग असिस्टंट-आदित्य राणा आदिंनी यश मिळविले आहे.
प्राचार्य ए.व्ही. सूर्यवंशी म्हणाले, डॉ. विखे पाटील ही औद्योगिक प्रशिक्षण संस्था एमआयडीसीमध्ये असल्यामुळे येथील विदयार्थ्यासाठी प्लेसमेंटची सोय करून दिली जाते. त्यामुळे शंभर टक्के नोकरीची हमी विद्यार्थ्यांना मिळते तांत्रिक शिक्षक्षणाबरोबरच आधुनिक युगात अद्ययावत होण्यासाठी प्रत्येक विदयार्थ्यांना संगणक प्रशिक्षण दिले जाते. त्यामुळे नव्याने सुरु झालेल्या ऑनलाईन परीक्षा पध्दतीत संस्थेतील विद्यार्थी यशस्वी होत आहेत. शिक्षणाचे योग्य मार्गदर्शन, आधुनिक मशिनरी, तज्ञांचे मार्गदर्शन यामुळे विद्यार्थी परीपुर्ण होऊनच बाहेर पडत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना रोजगारच्या संधी हमखास उपलब्ध होत असून विद्यार्थी स्वतःच्या पायावर उभे राहण्यास सक्षम होत आहे. तसेच अनुभवी शिक्षक वर्ग असल्यामुळे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन देखील चांगल्या प्रकारे मिळते त्यामुळे विद्यार्थ्याचा आय.टी.आय ला प्रवेश घेण्यासाठी कल वाढत असल्याचे सांगितले.
या यशाबद्दल महाराष्ट्र राज्याचे महसूल व दुग्धविकास मंत्री व संस्थेचे चेअरमन ना.राधाकृष्ण विखे पाटील, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, संस्थेचे सचिव तथा संचालक डॉ. पी. एम. गायकवाड, मेडीकल कॉलेज अॅण्ड हॉस्पिटलचे संचालक डॉ. अभिजीत दिवटे, उपसंचालक (तंत्र) श्री सुनिल कल्हापुरे यांनी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे कौतुक केले.