कोपरगाव प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ यांच्या वतीने अकोले कृषी विद्यापीठ अंतर्गत पैलपाडा येथे महिला शेतकऱ्यांना पिकांचे उत्पन्न वाढवण्यासाठी बी बियाणांच्या वाणांची माहिती विकसित करण्यासाठी महाबीज शिवार फेरीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये चांदेकसारे येथील पोलीस पाटील प्रगतशील शेतकरी डॉ. सौ मीराताई गोरक्षनाथ रोकडे यांची निवड करण्यात आली होती. त्यांनी या शिवार फेरीमध्ये विविध बियाण्यांच्या वाणांची पाहणी करून माहिती घेतली.
कोपरगाव महाबीज कार्यालयाच्या संचालिका श्रीमती देवडे यांनी कोपरगाव तालुक्यातील काही महिला शेतकऱ्यांना या शिवार फेरीमध्ये सहभागी करून घेतले होते. यामध्ये सौ मीराताई रोकडे, सौ वर्षाताई रोकडे, श्रीमती वाबळे ,श्रीमती कदम अदीचा सहभाग होता. कोपरगाव तालुक्यातील आदर्श शेतीनिष्ठ शेतकरी म्हणून त्यांची निवड करण्यात आली होती.
यामध्ये सोयाबीन वांगे भोपळा भाजीपाला फळभाज्या व विविध कडधान्यांच्या वानांची पहाणी करण्यात आली. यावेळी माहिती देताना श्रीमती देवडे यांनी सांगितले की महिलांचा शेती पिकवण्यामध्ये मोठा सहभाग असतो. महिलांमध्ये शेतीची मोठी आवड असते. त्यामुळे जास्तीत जास्त शेतीचे उत्पन्न कसे वाढेल या दृष्टीने या शिवार फेरीचे आयोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. सौ मीराताई रोकडे यांनी या शिवार फेरी मध्ये आलेला अनुभव कथन केला. शेतीमध्ये पिकांचे उत्पन्न वाढवण्यासाठी यामुळे ऊर्जा मिळाली असल्याचे त्यांनी सांगितले.