तळेगाव दिघे ग्रामपंचायत निवडणुकीत थोरात-विखे गटात सत्ता संघर्ष

सरपंचपदासाठी तिरंगी तर पाच प्रभागात सदस्य पदासाठी लक्षवेधी लढती

0

संगमनेर : चंद्रकांत शिंदे पाटील

संगमनेर तालुक्यात राजकीय दृष्ट्या प्रतिष्ठेच्या आणि संवेदनशील समजल्या जाणाऱ्या तळेगाव दिघे ग्रामपंचायतच्या निवडणुकीत आजी-माजी महसूल मंत्र्यांचे गट एकमेकांच्या विरुद्ध मैदानात उतरले असून वंचितचा उमेदवार ही सरपंच पदासाठी या निवडणुकीत आपले नशीब आजमावत आहे. माजी महसूल मंत्री आ.बाळासाहेब थोरात यांच्या बिरोबा महाराज शेतकरी विकास मंडळाविरुद्ध विद्यमान महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या गटाच्या बिरोबा महाराज जनसेवा ग्रामविकास मंडळात प्रमुख लढत होत आहे.

         तळेगाव दिघे ग्रामपंचायत निवडणूक आजी-माजी महसूल मंत्र्यांच्या समर्थकांनी प्रतिष्ठेची केली आहे. लोकनियुक्त सरपंचपद ओबीसी महिलेसाठी राखीव आहे. त्यामुळे माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात गटाच्या बिरोबा महाराज शेतकरी विकास मंडळाच्या उमेदवार सौ.राजश्री बाबासाहेब कांदळकर विरुद्ध विद्यमान महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील गटाच्या श्री बिरोबा महाराज जनसेवा ग्राम विकास मंडळाच्या उमेदवार सौ.उषा रमेश दिघे आणि वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार सौ. शीला तात्यासाहेब दिघे यांच्यात तिरंगी सामना रंगणार आहे. माजी महसूल मंत्री आ. बाळासाहेब थोरात व जिल्हा परिषद सदस्य महेंद्र गोडगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर कांदळकर, सरपंच बाबासाहेब कांदळकर, सोसायटीचे अध्यक्ष केरू पाटील दिघे, शेतकी संघाचे संचालक सचिन दिघे, सोसायटीचे माजी अध्यक्ष भाऊसाहेब पुंजा दिघे, उपसरपंच रमेश सावित्रा दिघे, नजीर शेख, रावसाहेब जगताप, माजी उपसरपंच बाळासाहेब दिघे यांच्या नेतृत्वाखालील बिरोबा महाराज शेतकरी विकास मंडळाचे प्रभाग एक मधून जालिंदर नवनाथ दिघे, शोभा मनोहर कांदळकर, गीता प्रदीप दिघे प्रभाग दोन मधून रमेश दगू दिघे, आशा सुरज इल्हे, वैशाली राजेश दिघे प्रभाग तीन मधून संजय त्रिंबक जोर्वेकर, लक्ष्मण ज्ञानदेव भागवत, ज्योती गोकुळ दिघे प्रभाग चार मधून चांगदेव बाळू दिघे, रोहिणी संपत दिघे, तेरीजा दिनकर जगताप प्रभाग पाच मधून धनंजय जनार्दन इल्हे, भाऊसाहेब बाळासाहेब दिघे, कुसुम प्रकाश दिघे निवडणूक रिंगणात आहेत. तर विद्यमान महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, नगर दक्षिणचे खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व पंचायत समितीचे माजी उपसभापती नामदेव दादा दिघे, पुंजा आनंदा दिघे, बापूसाहेब नरहरी दिघे, रमेश कान्होबा दिघे, रामदास कारभारी दिघे, अण्णासाहेब सोपान दिघे, विकास गुरव, दत्तात्रय ज्ञानेश्वर दिघे, दीपक संपत दिघे, गोविंद कांदळकर, दत्ता जोर्वेकर, नवनाथ लक्ष्मण दिघे यांच्या नेतृत्वाखालील श्री बिरोबा महाराज जनसेवा ग्रामविकास मंडळाचे प्रभाग क्रमांक एक मधून मच्छिंद्र बाबुराव खोकराळे, कुसुम बबन दिघे, सुमन रावजी कांदळकर प्रभाग दोन मधून बाळू साहेबराव दिघे, दिपाली मीननाथ दिघे, मंदाबाई रघुनाथ इल्हे प्रभाग तीन मधून आबासाहेब तात्यासाहेब भागवत, अतुल दामू कदम, कोमल राहुल जगताप प्रभाग चार मधून मयूर नवनाथ दिघे, दुर्गा राजेश दिघे, सुरेखा सुभाष जगताप प्रभाग पाच मधून शिवाजी कचरू दिघे, सविता दत्तात्रय दिघे, शशिकांत बाळासाहेब जगताप निवडणूक रिंगणात आहेत. प्रभाग चार मधून आत्माराम संतुजी जगताप व प्रभाग पाच मधून गोरक्षनाथ सूर्यभान दिघे हे स्वतंत्र उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. तळेगाव दिघे ग्रामपंचायत निवडणूक जिंकण्यासाठी थोरात विखे गटाकडून साम, दाम, दंड, भेद नीतीचा वापर सुरू झाला असून निवडणूक प्रचार शिगेला पोहोचला आहे. दोन्ही गटांनी निवडणूक प्रतिष्ठेची केली असून सरपंचपदासाठी वंचितचा उमेदवारही आपली ताकद आजमावत आहे. तळेगाव दिघे ग्रामपंचायतच्या निवडणुकीत प्रथमच थोरात विखे गटांमध्ये लढत होत असून येथील सत्ता संघर्ष शिगेला पोहोचला आहे. दोन्ही गटांकडून सर्रास आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. येत्या रविवारी १८ डिसेंबरला मतदान होणार असून मंगळवारी २० डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. यावेळी ग्रामपंचायतच्या सत्ताधाऱ्यांपुढे सत्ता टिकवण्याचे आव्हान आहे तर विरोधी पॅनलच्या मंडळी पुढे परिवर्तन घडवण्याचे मोठे आव्हान या निवडणुकीत उभे ठाकले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here