कोळपेवाडी वार्ताहर :- आ.आशुतोष काळे यांनी आपल्या कर्तबगारीवर मतदार संघाचा सर्वांगीण विकास करून दाखविला त्या विकासकामांवर प्रभावित होवून जे कुटुंब मागील तीन पिढ्यांपासून कोल्हेंशी एकनिष्ठ होते. त्या कोपरगाव तालुक्यातील रवंदे येथील लामखडे कुटुंबाने आ.आशुतोष काळे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.
आ.आशुतोष काळे रवंदे परिसरात विकासकामांची पाहणी व आढावा घेण्यासाठी गेले असता मागील तीन पिढ्यांपासून कोल्हेंशी एकनिष्ठ असलेल्या लामखडे कुटुंबाने काळे गटात प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावेळी लामखडे यांच्या निवासस्थानीच हा छोटेखानी पक्ष प्रवेशाचा कौटुंबिक सोहळा पार पडला. यावेळी लामखडे कुटुंबातील रामदास लामखडे, अशोक लामखडे, तुकाराम लामखडे, संजय लामखडे, राजेश लामखडे, विपुल लामखडे, प्रमोद लामखडे, शुभम लामखडे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला. या कुटुंबाचे आ. आशुतोष काळे यांनी स्वागत करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
येणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वीच संपूर्ण कुटुंबच कोल्हे गटातून काळे गटात दाखल झाल्यामुळे हा कोल्हे गटासाठी मोठा हादरा असून हा आ. आशुतोष काळे यांच्या मतदार संघातील ३३२३ कोटीच्या विकासाचा करिश्मा असल्याचे बोलले जात आहे. यापुढील काळातही कोल्हे गटाच्या कार्यकर्त्यांची राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात इनकमिंग सुरूच राहणार असल्याचे यावरून दिसून येत आहे.
यावेळी लामखडे कुटुंबाने आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवेशाबाबत अतिशय मोजक्याच शब्दात प्रतिक्रिया देताना सांगितले की, संपूर्ण कोपरगाव मतदार संघाला कुटुंब समजून मतदार संघाचा कुटुंबप्रमुख या नात्याने आ.आशुतोष काळे यांनी एकाच पंचवार्षिक मध्ये ३३२३ कोटीचा निधी आणून मतदार संघाचा केलेला नेत्रदीपक विकास डोळ्यात भरणारा आहे.आणि विशेष म्हणजे हा विकास करतांना कोणत्या गावात कोणत्या पक्षाची सत्ता आहे किंवा हा आपला तो दुसऱ्याचा असा भेदभाव न करता संपूर्ण मतदार संघाचा केलेला विकास मनाला भावला असून त्यामुळे आमच्या संपूर्ण कुटुंबानेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.
यावेळी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक बाळासाहेब कदम, अशोक मुरलीधर काळे, अरुण चंद्रे, विद्यमान संचालक अनिल कदम, मा.नगरसेवक बाळासाहेब आढाव,पद्मविभूषण डॉ. शरदचंद्र पवार पतसंस्थेचे माजी व्यवस्थापक बाळासाहेब काळे आदी मान्यवर उपस्थित होते.