तुर्कीमधील भूकंपातील मृतांचा आकडा 3800 वर…

0

तुर्कीत सीरियाच्या सीमेनजीकच्या भागात सोमवारी पहाटे सव्वाचारच्या सुमारास शक्तिशाली भूकंप झाला. त्यानंतर पुन्हा आता भूकंपाचा झटका तुर्कीत जाणवला आहे. नव्या भूकंपाची तीव्रता 7.5 इतकी आहे.

सकाळी झालेल्या भूकंपात आतापर्यंत 3800 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाल्याचं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. दुसऱ्या भूकंपात नेमकी काय हानी झाली आहे याबद्दल अद्याप माहिती उपलब्ध नाहीये.

दुसरा भूकंप हा स्थानिक वेळेनुसार दुपारी 1.24 झाला आहे. पहिल्या केंद्रापासून 80 मैल दूर असलेल्या एल्बिस्टान या ठिकाणी झाला आहे. हा आकडा वेगाने वाढत आहे असंही त्यांनी सांगितलं. 3000हून अधिक नागरिक या भूकंपात जखमी झाल्याचंही त्यांनी सांगितलं.

दरम्यान, सीरियात भूकंपामुळे 42 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 7.8 अशी नोंदली गेली. भूकंपाची तीव्रता लक्षात घेऊन राष्ट्राध्यक्ष अर्दोआन यांनी आणीबाणी जाहीर केली आहे. भूकंपात अडकलेल्या लोकांच्या सुटकेचं काम सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here