त्या २५ कामगारांना न्याय द्या मग स्वेच्यानिवृत्ती बद्दल आदेश काढा. : संदीप शेनकर

0

अकोले प्रतिनिधी :-
अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या प्रशासनाने, अर्थात संचालक मंडळ व कार्यकारी संचालक यांनी दि.०३/०३/२०२३ रोजी कार्यालयीन आदेश काढून स्वेच्या निवृत्तीची योजना जाहीर केली आहे, कारखाना प्रशासनाचा त्यामागील उद्देश कि कारखाना प्रशासनाचा कर्मचाऱ्यांच्या वेतणावर अतिरिक्त खर्च होत असल्यामुळे कारखाना सातत्याने तोट्यात जात आहे.. मात्र काही गोष्टींकडे कारखाना गांभीर्याने पाहत नाही, कारखान्यात मागील ४-५ वर्षात मोठ्या प्रमाणात कर्मचारी भरती केली गेली, ज्यात मोठ्या प्रमाणात अगस्ती कारखान्याच्या तत्कालीन व आत्ताच्या संचालक मंडळाच्या हितसंबंधातील लोक आहेत, मात्र त्यांनी आजपर्यंत त्यांच्या आयुष्यातील ४-५ वर्षे आशेपोटी वाया घातली आणि आज कारखाना प्रशासन कर्मचारी कपातीबद्दल प्रसिद्धी पत्रक काढत आहे, मग पाच वर्षांपूर्वी ही कर्मचारी भरती केलीच का..? असा सवाल भारत राष्ट्र समितीचे कार्यकर्ते (B R S ) व तसेच सामाजिक कार्यकर्ते संदीप भाऊसाहेब शेनकर यांनी कारखाना प्रशासनाला केला आहे. आपल्या पत्रकात शेंकर यांनी पुढे म्हटले आहे की एवढे वर्षे या कामगारांच्या वेतानावर भरमसाठ प्रमाणात पैसा खर्च केला आणि आज कर्मचाऱ्यांना स्वेच्या निवृत्ती बद्दल बोलण्याचा नैतिक अधिकार कारखाना प्रशासनाला आहे का..? त्याही पुढे जाऊन कारखाना प्रशासन आकृतिबंधाला अनुसरून कर्मचारी जास्त आहेत असे सांगत आहे, मात्र कारखाना प्रशासनाने मागील ५-७ वर्षात इतर कारखान्यांप्रमाणे कोणतेही आधुनिकीकरण केलेले नाही आणि आज बोलत आहेत कि कर्मचारी जास्त आहेत.आकृतिबंध पाहता सदर डिसिएस ऑपरेटर हे पद सिजनल आहे मात्र आपल्या कारखान्याने त्या सर्व चारही डिसिएस ऑपरेटरांना कायम म्हणून घेतलेले आहे, कारण या डिसिएस ऑपरेटरांमध्ये एक कारखान्याचे माजी हेड टाइम किपर तसेच सध्याचे लेबर ऑफिसर यांचे चिरंजीव आहेत त्यामुळे कारखाना ही झळ सोसत आहे, त्या डिसिएस ऑपरेटरांची शैक्षनिक व अनुभवाची पात्रता कारखान्याच्या जाहिरातीत सांगितल्याप्रमाणे नाही, व सदर भरतीत पात्र, अनुभवी उमेदवारांना डावलून व चुकीच्या पद्धतीने या डिसिएस ऑपरेटरांना घेतल्याची लेखी तक्रार आपण कारखाना प्रशासनाकडे केली होती त्यावर कारखाना प्रशासनाने टाळाटाळ केल्याने, साखर आयुक्त, व प्रादेशिक सह-संचालक (साखर) यांच्याकडे तक्रार केली होती, तसेच अन्याय झालेल्या उमेदवारांना घेऊन प्रादेशिक सह-संचालक (साखर), अहमदनगर यांच्यापुढे सुनावणीसाठी गेलो होतो . आज देखील ते डिसिएस ऑपरेटर कायम म्हनुन सेवेत आहेत . हेच काम करणाऱ्या कामगारला पगार ७००० आणि या डिसिएस ऑपरेटरांना पगार २५००० अशी तफावत आढळून आली आहे. जे २५-३० कर्मचारी आपला कारखाना उभारणीच्या वेळी कायम म्हणून सेवेत घेतले या आशेने संगमनेर सहकारी साखर कारखाना येथील सिजनलची नोकरी सोडून अगस्ती साखर कारखान्यात आले,अर्थात त्यांना नंतर सिजनल करण्यात आले व आज देखील ते सिजनल म्हणूनच काम करत आहेत, अश्या चुकीच्या व वशिलेबाजीच्या पद्धतीने भरती करणाऱ्या प्रशासनाला आज स्वेच्यानिवृत्ती घ्या म्हणण्याचा नैतिक अधिकार नाही . ज्या बॉयलरसाठी ते चार डिसिएस ऑपरेटर भरलेले आहेत तो बॉयलर आज देखील मॅन्युअली चालू आहे मग मागील तीन वर्षांपासून कारखाना प्रशासनाणे त्या चार डिसिएस ऑपरेटरांवर जवळपास ४० लाख रुपये खर्च का केले, त्यामुळे कर्मचारी कापत न करता असे अशा वशिल्याच्या तट्टू कडून अधिकचे कामे कुरुब घ्यावे तसेच कारखाना व्यवस्थापनाने इतर उत्पन्नाचे स्रोत निर्माण करावेत. आकृतिबंधानुसार आज देखील कारखान्यात कर्मचारी विभागणी झाल्याचे दिसत नाही, इंजिनीरिंग सारख्या अवघड ठिकाणी कोणी काम करायला तयार नाही मात्र ऑफिस मध्ये टेबल आणि खुर्च्या ठेवायला जागा नाही..खरी कारखाना प्रसासनाने शिस्त निर्माण करण्याची आवश्यकता आहे मात्र कारखाना प्रशासन कामगारांकडून स्वच्छ निवृत्तीची अपेक्षा करत आहे.. माझी कामगार बंधुंना विनंती आहे की ज्यांना कोणाला आजारपणामुळे काम होतंच नसेल किंवा काही कौटुंबिक अडचणी असतील अश्या कामगार बंधूनी स्वेच्यानिवृत्ती घेऊन आपल्या सोबत काम करणाऱ्या इतर कामगार बंधुंच्या भविष्यासाठी हातभार लावावा जेणे करून आपली भाग्यलक्ष्मी टिकेल. अशी अपेक्षा शेनकर यांनी पत्रकाद्वारे व्यक्त केली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here