देवळाली प्रवरात “श्री”ना उत्साही वातावरणात निरोप
देवळाली प्रवरा /प्रतिनिधी
देवळाली प्रवरा नगर पालिका हद्दीतील गणेश भक्तांकडून पर्यावरणपूरक गणेश विसर्जनास पसंती दिली असून “श्री” ना उत्साही वातावरणात निरोप दिला. नगर पालिकेच्या आवाहानास प्रतिसाद मिळाला आहे.
देवळाली प्रवरा नगर पालिकेचे मुख्याधिकारी तुषार आहेर व प्रशासकीय अधिकारी सुदर्शन जवक यांच्या मार्गदर्शनाखाली नगर पालिका आरोग्य विभाग प्रमुख कृष्णा महांकाळ यांनी गणेश मुर्ती संकलन व निर्मल्य गोळा करण्यासाठी स्वतंञ ट्रॅक्टरची व्यवस्था करण्यात आली होती.ट्रॅक्टरद्वारे घरोघरी जावून मुर्ती व निर्मल्य संकलन करण्यात आले.तत्कालीन मुख्याधिकारी अजित निकत यांनी तीन वर्षापूर्वी मुर्ती व निर्मल्य संकलनाची संकल्पना राबविली होती.तीच संकल्पना राबविण्यात आली आहे.
देवळाली प्रवरा व राहुरी फॅक्टरी परिसरातील गणेश भक्तांनी ओढे, तलाव, विहिरीत गणपती आणि गौरी निर्माल्य विसर्जन न करता नगरपालिकेने देवळाली प्रवरा बाजारतळ, पाण्याची टाकी तर राहुरी फॅक्टरीतील आदीनाथ वसाहत व कारखाना टेल टॅंकजवळील कृत्रीम तलावात विसर्जन करावे असे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला नागरिकांनी चांगला उस्फुर्त प्रतिसाद दिला आणि पर्यावरण पूरक गणेश विसर्जन करण्यात आले.
देवळाली प्रवरा शहरातील गावठाण परिसर, वाड्या वस्त्यांवर तसेच राहुरी कारखाना परिसरात नगरपालिका कर्मचाऱ्यांनी फेरी मारून गणेशमुर्तीचे संकलन करुन विसर्जन ठिकाणी गणेश मूर्ती जमा करून कृत्रिम तलावात विसर्जन केले आहे.
गणेश मुर्ती विसर्जन करणे करीता देवळाली प्रवरा नगरपालिकेचे सुरेश चासकर, कपिल भावसार, संभाजी वाळके, भारत साळुंके, भूषण नवाल, नानासाहेब टिक्कल, विजय साठे, तुषार सुपेकर, सारंगधर टिक्कल, भरत साळुंके,उदय इंगळे, बबन शिंदे, सुदाम कडू ,राजेंद्र पोकळे, भास्कर जाधव ,सुनील कल्हापुरे, अशोक जाधव, अमोल पंडित , अनिल सरोदे, किशोर सरोदे, सोमनाथ सूर्यवंशी, गोरख भांगरे, विकास गडाख, राजेंद्र कदम, नंदू शिरसाठ, विजय वाणी, निळकंठ लगे, किरण मकासरे,राजेंद्र चव्हाण, ज्ञानेश्वर सरोद, दिपक वाळूंज, अकिल शेख,रोहित पंडित, गौरव जेधे, प्रकाश कदम, संतोष हारदे, रोहित शेलार, करण अडागळे तसेच दिवाबत्ती-वृक्ष विभाग व अग्निशामक विभाग कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.