देवळाली प्रवरा /प्रतिनिधी
राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा नगरपरिषदेवर सफाई कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी सोमवारी आक्रोश मोर्चा काढला. अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसच्या महाराष्ट्र सरचिटणीस व भीम आर्मीचे जिल्हा कार्याध्यक्ष मुन्नाताई चावरे यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आलेल्या मोर्चात सफाई कामगार सहभागी झाले होते.
देवळाली प्रवरा सोसायटी डेपो येथून हातात झाडू घेऊन निघालेला सफाई कामगार बंधू-भगिनींचा मोर्चा देवळाली प्रवरा नगरपरिषद येथे पोहोचल्यानंतर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. सफाई कर्मचाऱ्यांची १०० टक्के पदभरती करावी, बाह्यस्त्रोत सफाई कर्मचाऱ्यांना किमान वेतन मिळावे, शासनाने सफाई कर्मचाऱ्यांना दिलेल्या घरांचा मालकी हक्क मिळावा, सर्व नगरपंचायत व पालिकांमध्ये वर्ग ३ कर्मचाऱ्यांप्रमाणेच वर्ग ४ ची भरती केली जावी. आवडमधील १९९३ च्या न्यायालयीन आदेशानुसार नियुक्त सफाई कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा, आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. यावेळी भीम आर्मी जिल्हाध्यक्ष तानसेन बिबाल,पापाभाई बिलाल आंदोलनस्थळी भेट देऊन सफाई कामगारांच्या न्याय देण्यासाठी जिल्हाभर आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. भीम आर्मीचे जिल्हा कार्याध्यक्ष मुन्नाताई चावरे यांनी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
नगर पालिकेचे मुख्याधिकारी तुषार आहेर व प्रशासकीय आधिकारी सुदर्शन जवक यांनी निवेदन स्वीकारुन कंञाडी कामगारांना किमान वेतन दिले जात आहे.तरीही ठेकेदारास लेखी पञाद्वारे किमान वेतन देण्याचे आदेश देण्यात आले.आपल्या मागण्या शासनस्थरावर पोहचविण्यात येतील असे मुख्याधिकारी आहेर यांनी आंदोलकासमोर सांगितले.
यावेळी भीम आर्मीचे राहाता तालुकाध्यक्ष जयश्री सोनवणे, ज्योती खंदारे, संगीता डोंगरे, ज्योती थोरात, शोभा ननवरे, मीरा गायकवाड, कविता सरोदे, ताराबाई सरोदे, मंगल सरोदे, संगीता सोजवळ, मंदा पंडित, कमल बर्डे, स्वाती शेलार, रोहिणी लाहुंडे, संजय सरोदे, योगेश शेलार, नितीन सरोदे, संदेश सकट, रोहित शेलार, अशोक शेलार, सुधाकर सरोदे, करण अडागळे, शेखर शिंदे,अविनाश बर्डे, बापू सरोदे, महेश पवार, सागर सकट उपस्थित होते.