देवळाली प्रवरात श्री साई उत्सवाच्या मंडप उभारणी कामाचा शुभारंभ.

0

देवळाली प्रवरा / प्रतिनिधी 

         राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा बाजारतळ येथे श्री साई प्रतिष्ठान व शहरवासीय यांच्या वतीने आयोजित श्री साई  चरित्र पारायण व भव्य कीर्तन महोत्सव सोहळ्याचा मंडप कामाचा शुभारंभ आज मंगळवार दि. २४ डिसेंबर रोजी सकाळी पार पडला.

       

देवळाली प्रवरा बाजारतळ येथे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात साई पारायण सोहळा व कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. यंदाचे ११ वे वर्ष असून २ ते ९ जानेवारी २०२५ या कालावधीत पारायण सोहळा व राज्यातील नामांकित किर्तनकारांची कीर्तन सेवा, हरिपाठ, दररोज हजारो भाविकांना महाप्रसाद वाटप संपन्न होणार आहे.

         या निमित्ताने श्री साई प्रतिष्ठान व शहरवासीयांच्या वतीने जय्यत तयारी सुरू करण्यात आली असून भव्य दिव्य मंडप देवळाली प्रवरा बाजार तळावर उभारण्यात येत असून या कामाचा शुभारंभ नारळ वाढवून आज करण्यात आला. यावेळी श्री साई प्रतिष्ठानचे सदस्य व शहरवासीय उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here