कोळपेवाडी वार्ताहर – कोपरगाव मतदार संघातील प्रत्येक गावातील व मुख्य रस्त्यापासून गावाला जोडणाऱ्या बहुतांश रस्त्यांना निधी दिला असून त्याप्रमाणे नाटेगांव व परिसरातील उर्वरित रस्त्यांसाठी देखील निधी उपलब्ध करून देवू अशी ग्वाही आ.आशुतोष काळे यांनी दिली.
कोपरगाव तालुक्यातील नाटेगाव येथे २० लक्ष रुपये निधीतून करण्यात येणाऱ्या नाटेगाव ते येसगाव प्रजिमा ४ ला मिळणाऱ्या रस्त्याचे भूमिपूजन व १० लक्ष रुपये निधीतून देण्यात आलेल्या ओपन जिम साहित्याचे लोकार्पण आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी ते बोलत होते.ते म्हणाले की, नाटेगावचा पिण्याच्या पाण्याचा पाणी प्रश्न कायमचा सोडविण्यासाठी १ कोटी १५ लाख निधी देवून विविध विकास कामे तसेच विविध रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावून जवळपास एक कोटी नव्वद लाखांचा निधी दिला आहे.उर्वरित रस्त्यांचा देखील प्रश्न निकाली काढून निधी उपलब्ध करून देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी जयराम धोंडू मोरे, रामनाथ बाबासाहेब मोरे, मोहन चंद्रभान मोरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला त्यांचे आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी ह.भ.प. सोमनाथ महाराज मोरे, कारभारी आगवन, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष दिलीपराव बोरनारे, संचालक श्रावण आसने, सांडूभाई पठाण, किरण कुदळे, विलास दिनकर मोरे, रावसाहेब मोरे, गोरख काळे, रामनाथ मोरे, बापूसाहेब नरोडे, मोहन मोरे, अशोक मोरे, रघुनाथ मोरे, बाबासाहेब मोरे, प्रणव मोरे, संतोष दाणी, विश्वनाथ पोळ, गणपत मोरे, कल्याण जठारे, विशाल जगदाळे, जनार्दन मोरे, गणेश मोरे, अच्युत मोरे, बाळासाहेब मोरे, सतिश मोरे, गणेश मोरे, जालिंदर उळेकर, रंगनाथ मोरे, जयवंत मोरे, सतिश मोरे, माधव मोरे, सुभाष उळेकर, प्रभाकर मोरे, प्रभाकर कों मोरे, योगेश मोरे, चांगदेव सोळसे, संतोष मोरे, भरत भालके, आंबादास मोरे, शिवाजी मोरे, रामनाथ मोरे, माणिक मोरे, पुंडलिक मोरे, किरण मोरे, शंतनू कुदळे, नवनाथ मोरे, तुकाराम मोरे, नारायण मोरे, उपअभियंता एस.आर. दळवी, शाखा अभियंता सी.डी. लाटे, नितीन गायकवाड आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते