नाशिक :
नाशिक विभागातील शिक्षकांच्या समस्या त्वरित मार्गी लावा . शिक्षण संचालक संपत सुर्यवंशी यांना मुख्याध्यापक संघाच्या वतीने निवेदन देण्यात आले.
नाशिक जिल्ह्यासह विभागात मुख्याध्यापक ,शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या समस्या दिवसे -न- दिवस गंभीर होत चालल्या आहे . गेल्या ६ ते ७ वर्षापासुन शिक्षकांचे फरक बीले, मेडीकल बीले , रजा रोखीकरण असे १३६ कोटी रुपयांची बीले निधी अभावी पडून आहे . शिक्षक व पदवीधर आमदारांसह सर्व संघटनांनी सतत पाठपुरावा करून ही बीले मिळत नाही यामुळे शिक्षक मेटाकुटीला आले आहे .या फरक बीलाच्या भरवशावर शिक्षकांच्या मुला – मुलींचे शिक्षण , लग्न स्वतःसह आई वडील आजारपण यासाठी शिक्षकांना कर्ज काढावे लागत आहे . शिक्षकांवर कर्जाचा बोजा वाढत चालला आहे . तरीही याकडे कोणीही गांभीर्याने बघायला तयार नाही . तसेच नाशिकमधील काही शिक्षण संस्थाचालक यांच्या अंतर्गत वादामुळे बऱ्याच शिक्षकांच्या मान्यता , शालार्थ आय .डी , आँट्याज / डीट्यॉज करून पगार काढणे बाकी आहे . शिक्षण विभाग राजकीय दबावापोटी ऑनलाइन प्रणालीत नाव टाकण्यास एकवर्षापासुन टाळा टाळ करत आहे यात शिक्षकांचा काहीही दोष नसताना मोठ्या आर्थिक हाणीला सामोरे जावे लागत आहे . शिक्षिका भगिनींचे संसार उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे . १४ /१५ वर्षा पासुन बीनपगारी काम करतात .राजकीय पुढारी अशा संस्थेचा राग आमच्या शिक्षकांवर काढत असतील तर मा . शिक्षणआयुक्त / शिक्षण संचालक व शिक्षण विभागाने याची गंभीर दखल घेतली पाहिजे . संस्था चालकांच्या चुकाचा भुरदंड आमच्या शिक्षकांना बसता कामा नये याची सविस्तर चौकशी करून अशा संस्थावर प्रशासक लावुन शिक्षकांच्या समस्या सोडवण्याची मागणी नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सचिव श्री एस बी देशमुख यांच्यासह शिक्षकांनी केली आहे . याबाबत मा . शिक्षण संचालक संपत सुर्यवंशी यांनी चौकशी करून आठ दिवसाच्या आत शिक्षकांना न्याय मिळवुन देण्याचे आश्वासन दिले .