42 वी ज्युनिअर गट मुले व मुली महाराष्ट्र अजिंक्यपद ननिवड चाचणी शुटींग बाँल स्पर्धेचे उद्धाटन ,दोन दिवस चालणार सामने
देवळाली प्रवरा /प्रतिनिधी
पुस्तकातून बुद्धीचा विकास होतो. खेळातून शरीराचा विकास होतो.सर्व खेळाडूंनी रागू नका रुसू नका, हाँलीबाँलचा घेतलेला वसा टाकू नका खेळाडूंनी गुणावर खेळ दाखवावा असे आवाहन माजी आ.चंद्रशेखर कदम यांनी केले आहे.
देवळाली प्रवरा येथिल श्री.छञपती शिवाजी माध्यमिक विद्यालयात 42 वी ज्युनिअर गट मुले व मुली महाराष्ट्र अजिंक्यपद ननिवड चाचणी शुटींग बाँल स्पर्धेचे उद्धाटन जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे विश्वस्त जयंत रामनाथ वाघ व मुकेश माधव मुळे यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आ.चंद्रशेखर कदम हे होते.त्यावेळी कदम बोलत होते.यावेळी रेसिडेन्शिअल विद्यालयाचे प्राचार्य विजय पोकळे,शुटींग बाँल असोशियनचे सचिव विष्णू निकम,शकील काझी,अतुल निकम,दत्ता कडू,माजी प्राचार्य बाबा चव्हाण,छञपती पुरस्कार विजेते राजेंद्र मोहिते,सदाशिव माने,भारत शेटे,सतिष वाळूंज, डाँ.शेख, चंद्रशेखर कान्हेरकर,मच्छींद्र कदम आदी उपस्थित होते.
यावेळी संस्थेचे विश्वस्त मुकेश मुळे व जयंत वाघ यांनी आपल्या भाषणातून खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.खेळात नविन सुधारणा झाल्या आहे.खेळातील गुणावर खेळ अवलंबून असतो.निवड चाचणी शहरात घेतल्या जातात.परंतू देवळाली प्रवरा अपवादत्मक गाव आहे. निवड चाचणीचे यजमानपद मिळाले आहे.
यावेळी माजी आ.चंद्रशेखर कदम म्हणाले की,पुस्तकातून बुद्धीचा विकास होतो.तर खेळातून शरीराचा विकास होतो. खेळाडूंनी मैदानावर खेळ दाखवून गुणांचा आधार मिळावा. त्यातून निवड चाचणीत खेळाडूंची निवड होताना दर्जेदार खेळ करणाऱ्या खेळाडूंची निवड होईल असे कदम यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे प्राचार्य पोपट कडूस यांनी केले.तर सुञसंचालन व आभार प्रदर्शन प्रा.गणेश भांड यांनी केले.