पंधरा हजारांची लाच घेताना कोपरगाव तहसीलच्या दोन कर्मचाऱ्यांसह तिघे अटक 

0

कोपरगाव : पंधरा हजारांची लाच   प्रकरणात कोपरगाव तहसिल कार्यालयातील दोघांसह खाजगी इसमावर लाच लुचपत विभागाकडून कारवाई करण्यात आली. यामध्ये दोन आरोपी ताब्यात घेण्यात आले तर एक आरोपी फरार होण्यात यशस्वी झाला. फरार आरोपीचा पोलीस शोध घेत आहे.

     महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी वाळू वाहतूकदार तक्रारदाराच्या वाळू वाहतुकीच्या ट्रॅक्टरवर कारवाई न करण्यासाठी खाजगी इसमा मार्फत पंधरा हजार रुपयांची लाच मागून  त्याच्या हस्ते ती स्वीकारल्याने सदर खाजगी इसमाला नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले असून आरोपी लोकसेवक कोपरगाव तहसील कार्यालयातील अव्वल कारकून आणि लिपिक यांच्यासह खाजगी इसमावर पथकाने कारवाई केली आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. यामध्ये कोपरगाव तहसील कार्यालयातील लिपिक आणि खाजगी इसम असे दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले असून अव्वल कारकून मात्र फरार असून त्याचा शोध सुरू आहे. अँटी करप्शन विभागाच्या या कारवाईमुळे महसूल विभागात खळबळ उडाली असून लाचखोरारांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.

     

याबाबत अँटीकरप्शन विभागाकडून मिळालेली माहिती अशी की, यातील तक्रारदार यांचा वाळू वाहतुकीचा व्यवसाय असून ते सदरील व्यवसायासाठी वापर करीत असलेल्या ट्रॅक्टर वर कारवाई न करण्यासाठी कोपरगाव तहसील कार्यालयातील आलोसे चंद्रकांत नानासाहेब चांडे वय  ३९ लिपिक आणि योगेश दत्तात्रय पालवे वय ४५ अव्वल कारकून हल्ली राहणार कोपरगाव यांनी आरोपी खाजगी इसम नामे प्रतीक कोळपे यांचे मार्फत तक्रारदार यास दरमहा 15 हजार रुपये लाचेची मागणी केली होती. तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलूचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक येथे तक्रार केली होती. त्यावरून दिनांक ०६/१२/२०२४ रोजी पंचा समक्ष केलेल्या पडताळणी कारवाईत लिपिक चंद्रकांत चांडे यांनी तक्रारदार यांच्याकडे पंचांसमक्ष पंधरा हजार रुपये लाचेची मागणी केली व मागणी केलेली लाचेची रक्कम खाजगी आरोपी इसम नामे प्रतीक कोळपे याचेकडे देण्यास सांगितले. त्यामुळे तक्रारदार यांनी खाजगी ईसम नामे प्रतीक कोळपे यास संपर्क केला असता त्याने लिपिक चांडे यांनी मागणी केलेली लाचेची रक्कम स्वीकारली.  त्यानंतर आरोपी पालवे व चांडे यांना फोन द्वारे आरोपी खाजगी इसम प्रतीक कोळपे याने १५,०००/- रु.लाचेची रक्कम  स्वीकारले बाबत सांगितले असताचंद्रकांत चांडे व योगेश पालवे यांनी खाजगी इसम प्रतीक कोळपे यास सदर लाचेची रक्कम स्वीकारण्यास संमती दिल्यामुळे आलोसे व आरोपी खाजगी इसम यांचे विरुध्द कोपरगाव शहर पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 चे कलम ७, ७ अ व 12 अन्वये गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया चालू आहे.   

     

 सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक परिक्षेत्राच्या पोलीस अधिक्षक शर्मिष्ठा घारगे वालावलकर, यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी पोलीस उपअधीक्षक संतोष पैलकर,सह सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक संदीप घुगे, सापळा पथक’ पोलीस हवालदार दिनेश खैरनार, गणेश निंबाळकर, पोलीस नाईक अविनाश पवार,पोलीस शिपाई नितीन नेटारे यांच्या पथकाने केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here