कोळपेवाडी वार्ताहर – कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व उद्योग समुहातील प्रगतीपथावर असलेल्या पद्मविभूषण डॉ.शरदचंद्रजी पवार साहेब नागरी सहकारी पतसंस्थेची संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक माजी आमदार अशोकराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली व आमदार आशुतोष काळे यांच्या नेतृत्वाखाली बिनविरोध पार पडली आहे.
कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व उद्योग समुहाचे संस्थापक कर्मवीर शंकररावजी काळे साहेब यांनी स्थापन केलेल्या अहमदनगर जिल्ह्यात पतसंस्था क्षेत्रात अग्रगण्य असणा-या कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथील पद्मविभूषण डॉ. शरदचंद्रजी पवार साहेब नागरी सहकारी पतसंस्थेची २०२२ ते २०२७ या कालावधीसाठी होणारी संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी नामदेवराव ठोंबळ यांनी जाहीर केले आहे. २९ डिसेंबर २०२२ ते ४ जानेवारी २०२३ या कालावधीत संचालक पदासाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या मुदतीत एकूण ११ जागेसाठी फक्त ११ उमेदवारी अर्ज दाखल झाल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी नामदेवराव ठोंबळ यांनी अर्ज दाखल केलेल्या सर्व उमेदवरांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.
बिनविरोध निवडून आलेले सदस्य पुढीलप्रमाणे रावसाहेब शंकर चौधरी, देवेंद्र गोरख रोहमारे, अनिल जनार्दन महाले, महेंद्र अशोक काळे, सुदाम हरिभाऊ वाबळे, व्यंकटेश प्रतापराव बारहाते, बन्सी गंगाराम निकम, सौ. परवीन तालिब सय्यद, सौ. मेघा चंद्रशेखर कडवे, वीरेंद्र सतीश शिंदे, ज्ञानेश्वर बबनराव हाळनोर या सदस्यांची बिनविरोध निवड झाली आहे. सर्व नवनिर्वाचित सदस्यांचे कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व उद्योग समुहाचे मार्गदर्शक माजी आमदार अशोकराव काळे, आमदार आशुतोष काळे यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत. कोळपेवाडी परिसर व पंचक्रोशीतील छोट्या-मोठ्या व्यवसायिकांची आर्थिक गरजा भागविणारी प्रगतीशील संस्था असा नावलौकिक असणाऱ्या पद्मविभूषण डॉ.शरदचंद्रजी पवार साहेब नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळावर झालेल्या निवडीबद्दल सर्व नवनिर्वाचित सदस्यांनी माजी आमदार अशोकराव काळे, आमदार आशुतोष काळे यांचे आभार मानले असून संस्था प्रगतीपथावर घेवून जाण्यासाठी प्रामाणिकपणे सोपविलेली जबाबदारी पार पाडणार असल्याचे सांगितले आहे.