पाचही जिल्ह्यातील प्रत्येकाशी ऋणानुबंध कायम- सत्यजित तांबे

0

नंदुरबार येथे विराट मेळावा, सर्वपक्षीय नेते उपस्थित

संगमनेर : अक्कलकुवाच्या मणिबेली पासुन ते नगरच्या चौंडी पर्यत अहिल्याबाई होळकरांचे जन्मस्थळ असलेल्या साडेपाचशे किलोमीटर परिसरात डॉ सुधीर तांबेंनी मतदारांशी बनवलेला ऋणाणुबंध कायम चालु राहीला पाहीजे यासाठी आम्ही शेवटच्या घटकापर्यत पोहचत  असल्याचे मत अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबेनी व्यक्त केले. या मतदार संघातील प्रत्येकाशी नामांकनावेळी आणि त्यानंतर झालेल राजकारण  आमच्या परिवाराला अडचणीत आणण्यासाठीच  झाले असुन  वेळ आल्यावर याबद्दल मी बोलेलच असा इशाराही त्यांनी दिला.
           नाशिक पदवीधर मतदार संघातील सर्वांच्या चर्चेचा विषय राहीलेले अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांच्या प्रचारार्थ नंदुरबारमधल्या छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदीरात सभा झाली. यावेळी बोलतांना सत्यजीत तांबेंनी नामांकनाच्यावेळी झालेल्या नाट्यमय घडामोडी मतदारांसमोर मांडल्या. मी कॉग्रेस पक्षाला सांगितले मला उमेदवारी द्या, परंतु काही कारणास्तव निर्णय झाला नाही. मी कॉग्रेसकडुन नामांकन देखील दाखल केले होते. मात्र माझा एबी फार्म  माझ्या पर्यत पोहचला नाही. त्यामुळे माझी अपक्ष उमेदवारी झाली असा खुलासा यावेळी सत्यजीत तांबेनी केला. गेली पंधरा वर्षे माझे वडील सुधीर तांबे यांनी आपल्या कामाच्या जीवावर, त्यांच्या जनसंपर्कातुन,  स्वभावातुन त्यांनी लोकांची मन जिंकण्याच काम या मतदार संघात केले आहे. मागच्या पंधरा वर्षात शिक्षक, डॉक्टर्स, वकील, पदवीधर, बेरोजगार यांच्या प्रश्नावर प्रामाणिक काम करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. मी मागच्या वीस वर्षापासुन संघटनेच्या माध्यमातुन काम करत आलो आहे. आता मोठ्या व्यासपीठावर प्रश्न मांडण्याची संधी मिळाली पाहीजे यातुन ही उमेदवारी केली आहे. आठ दिवासापासुन प्रचारासाठी फिरत आहे.  मतदारांचे प्रश्न गंभीर आहेत. अपुरे शिक्षक, शिपाई, शिक्षकेत्तर कर्मचा-यांची संख्या,  भरती नसल्याने यंत्रणेवर मोठा ताण, संस्थाचालकांचे मोठे प्रश्न आहेत. आज शाळा माजी विद्यार्थी आणि लोकसहभागावर  सुरु  आहेत. त्यामुळेच आगामी काळात यासाठी व्यापक काम करणार आहे. याच अनुशंगाने एप्रिल महिन्यात शिक्षक परिषद घेणार असुन यातुन , महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्राला पंचवीस वर्षाच्या पथदाखवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे देखील  सत्यजीत तांबेनी सांगितले.
जुनी पेंशन , नो टेंशन, म्हणत याबाबत माझ्या वडीलांनी जुनी पेशन लागु करण्यासाठी विधानपरिषदेमध्ये प्रश्न माडंला. अभ्यास मंडळ स्थापन करण्याची मागणी करत राजस्थान, हिमाचल राज्यांमध्ये पाठविण्याची मागणी केली. जुनी पेंशन मध्ये दाखवले जाणारी आकडेवारी चुकीची असुन वास्तवता तशी नाही, असे सांगत राजकीय इच्छाशक्ती असेल तर हा मुद्दा सुटेल. नाही तर  जुनी पेंशन मुद्दा आगामी काळात देशाच्या निवडणुकीचा मुद्दा होईल. असेही यावेळी सत्यजीत तांबे म्हणाले. शिक्षण आणि आरोग्यसाठी या देशातल्या नागरीकांना एक पैसाही खर्च होता कामा नये या मताचा मी असल्याचे सांगत शिक्षणावर सात टक्के खर्च करायला हवा , मात्र आपण अडीच टक्केच खर्च करत असल्याचे सांगत त्यांनी याबाबत कठोर पावले उचलण्याची गरज व्यक्त केली.या सभेला माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी देखील डॉ सुधीर तांबेच्या कार्याचा उजाळा देत सत्यजीत तांबेच्या मागे ठामपणे उभे राहण्याचा निर्धार केला. सत्यजीत तांबेची अपक्ष उमेदवारी  मुळात आमच्या सारख्या राजकरण्यासाठी झाली असली तरी सर्वपक्षीय नेत्यांनी आपल्या पक्षाचे जोडे बाजुला ठेवुन सत्यजीत तांबेना विजयी करण्याचा मानस त्यांनी बोलवुन दाखविला.  यावेळी हिरालाल पगडाल, बी.एस दादा पाटील, नागेश दादा पाडवी, यशवंत नाना पाटील, मनोजभैय्या रघुवंशी, एन डी नांद्रे, सुरेश झावरे, युवराज पाटील आदिंसह संस्थाचालक , विविध संघटनांचे पदाधिकारी, मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here