पाणी प्रश्नाचे राजकारण करणाऱ्यांना येत्या निवडणुकीत गाडून टाका !

0

कोपरगाव : शहरातील जनतेचा अत्यंत जिव्हाळ्याचा असलेल्या पाण्याच्या प्रश्नावर राजकारण करणाऱ्यांना येत्या निवडणुकीत गाडून टाका . अशा तिखट शब्दात आमदार आशुतोष काळे यांनी आपले विरोधक कोल्हे यांच्यावर नाव न घेता टीका केली . कोपरगाव शहरासाठी सुरु असलेल्या ५ व्या साठवण तलावाच्या पूजनाचा कार्यक्रम आज दिनांक १५ सप्टेंबर रोजी येसगाव येथील साठवण तलावाच्या कार्यस्थळावर करण्यात आला होता. त्याप्रसंगी आमदार आशुतोष काळे बोलत होते.

५ व्या साठवण तलावाचे विधिवत जलपूजन सर्व धर्माच्या संत महात्म्यांच्या उपस्थितीत आज आमदार काळे यांच्या हस्ते करण्यात . यावेळी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे,माजी नगराध्यक्ष पद्माकांत कुदळे, व्यापारी महासंघाचे सर्व पदाधिकाऱ्यांसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. यावेळी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.

आमदार काळे पुढे म्हणाले की ५ व्या साठवण तलावासह असणारी पाणी योजना पूर्णत्वास जाऊ नये म्हणून विरोधकांनी अनेक अडचणी उभ्या केल्या .ते नेहमी पाणी प्रश्नासह सर्वच विकास कामांना विरोध करीत आले आहे. कारण त्यांना आपले राजकारण संपण्याची भीती आहे. शहरासह तालुक्याचा विकास झाला तर राजकारण कशाचे करायचे याचा त्यांना प्रश्न पडला आहे. त्यामुळे ते यासर्व कामांना ते विरोध करत आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत या विरोधकाना गाडून टाका . असे म्हणत आ. काळे यांनी विधानसभा निवडणुकीचे एक प्रकारचे शिंग फुंकले. आपल्या भाषणात काळे पुढे म्हणाले की आपण विरोधकांनी केलेली कामे पहिली तर जलतरण तलाव असा बांधला की त्याचा कोणालाही आतापर्यंत उपयोग झाला नाही , क्रीडासंकुल कोठे बांधले आणि त्याचा उपयोग कोण करीत आहे ?, बस स्थानक अशा पद्धतीने बांधले कि त्याचा उपयोग नाही ,ते संगमनेर सारखे व्यापारी संकुलासह बस स्थानक बांधले पाहिजे होते. त्यांनी केवळ चुकीचे कामे केली. मी खोटे सांगत नाही मात्र जो शब्द मी देतो तो खरा करतो . त्यामुळे २०१९ मध्ये जो आशीर्वाद मला दिला तो पुन्हा २०२४ साठीही द्यावा असे आवाहन आ. काळे यांनी केले.

कोपरगावला स्मार्ट सिटी बनवणार …. जलपूजन झाले पाणी प्रश्न संपला म्हणून थांबयाचे नाही . तर हि विकासाची घोडदौड अशीच पुढे सुरु ठेवायची आहे. शहर-तालुक्यातील रस्ते झाले , अनेक प्रशासकीय इमारती झाल्या ,एम आय डी सी आली , व्यापारी संकुल झाले, उपजिल्हा रुग्णालयाचे काम सुरु आहे. अनेक स्मारके, सभागृहे यासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध केला आहे . यासोबतच ३२३ कोटींची भुयारी गटारीची योजनाही मंजूर झाली आहे. यासर्व मुलभूत सुविधांमुळे शहराची बाजारपेठ सुधारत आहे. शहरासाठी जे जे पाहिजे ते सर्व आपण केल आहे . मात्र एव्हढ्यावरच आपण थांबणार नसून कोपरगावला जिल्ह्यात नव्हे तर राज्यात पहिल्या क्रमांकावर आणायचे आहे. शहराला विकसित शहरांच्या यादीमध्ये नेवून शहराला स्मार्टसिटी बनवायचे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here