पायी चालताना उजव्या बाजूने चला उपक्रमाचे नागेश विद्यालयात आयोजन.

0

रस्ता सुरक्षा अभियान  एनसीसी रॅलीचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते. 

 जामखेड तालुका प्रतिनिधी – रस्ता सुरक्षा अभियान २०२३  उप प्रादेशिक परिवहन कार्यालय अहमदनगर यांच्या विद्यमाने  रयत शिक्षण संस्थेच्या श्री नागेश विद्यालय मध्ये उजव्या बाजूने चला व वाहतूक नियम जनजागृती उपक्रम कार्यक्रम उत्साहात संपन्न. यावेळी  मोटार वाहन निरीक्षक आयशा हुसेन, पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक चेतन दासनूर, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक राहुल सरोदे,नागेश विद्यालयाचे  प्राचार्य मडके बी. के., यश मोटर ड्राइविंगचे संभाजी वाटाणे , यादव ड्रायव्हिंग स्कूलचे जगदीश यादव, दत्तकृपा मोटार ड्रायव्हिंग स्कूलचे शिवाजी देवकर,  उपप्राचार्य तांबे पी. ए. , पर्यवेक्षक कोकाटे , व्ही. के. , एनसीसी ऑफिसर मयुर भोसले , बोलभट रमेश, गोपाळ बाबर ,परिवहन समिती सचिव अशोक सांगळे , स्काऊट मास्टर शिंदे बी. एस. पोलीस कॉन्स्टेबल अविनाश ढेरे , शिक्षक, एनसीसी कॅडेट, विद्यार्थी आदी मान्यवर उपस्थित होते. 

            सहाय्यक मोटार वाहक निरीक्षक राहुल सरोदे यांनी विद्यार्थी पासून रस्ता सुरक्षा नियमांचे पालन केले तर अपघाताचे प्रमाण खूपच कमी राहील असे व  जिल्हाधिकारी यांच्या नावीन्यपूर्ण उपक्रम पायी चालताना उजव्या बाजूने चालणे या उपक्रमाची माहिती विद्यार्थ्यांना दिली.वाहतूक नियमांचे पोस्टर , साप शिडी  खेळातून वाहतूक नियमांची जनजागृती ,विविध वाहतुकीच्या चिन्हांची माहिती विद्यार्थ्यांना दिली. पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी  वाहतुकीच्या नियम  सूचनांचे मार्गदर्शन केले तसेच विद्यार्थी जीवनामध्ये मोटरसायकल चा वापर टाळावा. नियमांचा  पालन करावे. पालकांनी विद्यार्थ्यांकडे मोटरसायकल देऊ नये. वाहन चालवताना मोबाईलचा वापर टाळावा, शालेय जीवनामध्ये शिस्तीचे पालन करावे , पायी चालताना उजव्या बाजूने चालावे यासंदर्भात मनोगत व्यक्त केले.  शालेय विद्यार्थ्यांसाठी  वाहतुकी संदर्भातील महत्त्वाच्या सूचना, मोटर सायकल चालवणाऱ्या संदर्भातील सूचना, जड वाहन ,कार जीप चालक यांसाठी सूचनांचे पोस्टर चे प्रदर्शन नागेश विद्यालय भरवण्यात आले. वाहतूक सुरक्षा व पायी चालताना उजव्या बाजूने चला या सतरा महाराष्ट्र बटालियन अ. नगर  एनसीसी  रॅलीचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झाले . 

     वाहतुकीचे नियम पाळा अपघात टाळा , सतर्क रहा सुरक्षित रहा ,आवरा वेगाला सावरा जीवाला, मोबाईलवर हाय ठरेल अखेरचा बाय ,हेल्मेट तुमच्यासाठी सुरक्षा कुटुंबासाठी, अति घाई संकटात नेई, सुरक्षित अंतर सुरक्षित प्रवास, जो चुकला नेमाला तो मुकला जीवणाला मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक, दारूची बाटली मृत्यूला गाठली, या घोषणेने संपूर्ण  जामखेड शहर दुमडून निघाले. रॅलीचा मार्ग नागेश विद्यालय- बीड रोड- खर्डा चौक-  तपनेश्वर रोड- मिलिंद नगर- भुतवडा रोड या मार्गाने काढण्यात आली. रॅलीमध्ये वाहतूक संदर्भात नियमांचे पोस्टर ग्रामस्थांना देऊन जनजागृती करण्यात आली. 

        मोटार वाहन निरीक्षक निरीक्षक आयशा हुसेन, पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक चेतन दासनूर, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक राहुल सरोदे, यांनी रॅलीमध्ये पायी चालत उत्स्फूर्त सहभाग घेतला. या उपक्रमाचे समस्त ग्रामस्थांनी कौतुक केले. मोटार वाहन निरीक्षक  आयशा हुसेन  यांनी रस्ता सुरक्षा अभियान उपक्रमाचे आयोजन नागेश विद्यालय उत्कृष्ट रित्या केल्याबद्दल विद्यालयाची त्यांनी आभार मानले. व विद्यार्थी शिक्षक पालक यांनी वाहतूक नियमांचे पालन करावे असे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संभाजी इंगळे आभार प्रदर्शन शिंदे बी एस यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here