संगमनेर : संगमनेर तालुक्यातील उंबरी बाळापुर येथील जुन्या पिढीतील सामाजिक कार्यकर्त्या तथा संगमनेर पंचायत समितीचे माजी सदस्य सरुनाथ उंबरकर यांच्या मातोश्री स्व.पुंजाबाई सुखदेव उंबरकर यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
उंबरी बाळापुर आणि परिसरातील एक आदर्श कुटुंब म्हणून उंबरकर कुटुंबाकडे पाहिले जाते, या कुटुंबाच्या मातोश्री स्व. पुंजाबाई सुखदेव उंबरकर यांच्या निधनाने या परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या पश्चात मुले संगमनेर पंचायत समितीचे माजी सदस्य सरूनाथ उंबरकर, नानासाहेब, कैलास, विलास, बाळासाहेब अशी पाच मुले, मुली,सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.