कोपरगाव प्रतिनिधी : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या चित्ररथाचे कोपरगावात स्वागत तहसिलदार महेश सावंत यांचेसह स्थानिक नागरिकांचे वतीने करण्यात आले. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनाच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंती उत्सव निमित्ताने त्यांची जीवन गौरवगाथा सांगणारा चित्ररथ तयार करण्यात आलेला आहे.
या चित्ररथाचे कोपरगाव येथे आगमन झाल्यावर स्वागत तहसीलदार महेश सावंत, उपमुख्याअधिकारी मनोजकुमार पापडीवाल, ज्ञानेश्वर चाकणे, शांतता कमिटीचे नारायण अग्रवाल, स्वच्छतादूत सुशांत घोडके, धनगर समाजाचे विठ्ठलराव मैदड, रमेश टिक्कल,सेवानिवृत्त नायब तहसीलदार खिंवराज दुशिंग, रामदास आदमाने, किरण थोरात ,दिपक कांदळकर, मनील नरोडे, डॉ. सी. एम. मेहता कन्या विद्यालयाच्या प्राचार्य प्रमोदिनी शेलार, विद्या प्रबोधिनी शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय गवळी यांचे सह स्थानिक नागरिकांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
चित्ररथाचे निर्मितीकार, प्रसिद्ध शिल्पकार जयेश हाटले आणि अहिल्यादेवी यांची गौरव गाथा सांगणारा शाहिराचा कला मंच यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. याप्रसंगी डॉ. सी.एम. मेहता कन्या विद्यालय, विद्या प्रबोधिनी शाळेचे विद्यार्थी, स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.