पुतीन यांच्या पक्षाच्या नेत्यांचा ओडिशात रहस्यमय मृत्यू, आत्महत्या की घातपात?

0

गेल्या वर्षभरात रशियाने घेतलेल्या निर्णयांचा जगावर परिणाम झाल्याचं दिसून आलं. पण डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात भारतात घडलेल्या एका घटनेमुळे रशियातील राजकारण तापलं आहे. 

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याच पक्षाच्या दोन नेत्यांचा ओडिशामधील एका हॉटेलमध्ये मृत्यू झाला आहे.

मृतांमध्ये रशियन खासदार आणि उद्योगपती पावेल अँटोव्ह आणि त्यांचे सहकारी व्लादिमीर बेदेनोव्ह यांचा समावेश आहे. 

उंचावरून पडल्यामुळे पावेल अँटोव्ह यांचा मृत्यू झाल्याचं पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये म्हटलंय. तर त्यांचे सहकारी व्लादिमीर बेदेनोव्ह यांचा मृत्यू हार्ट अटॅकने झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

दक्षिण ओडिशातील रायगडा शहरात झालेल्या या दोन रशियन नागरिकांच्या मृत्यूंमुळे संशयाचं वातावरण निर्माण झालंय. ओडिशा सरकारने या प्रकरणी सीआयडी चौकशीचे आदेश दिलेत. त्याचबरोबर मानवाधिकार आयोगानेही याची दखल घेत गुन्हा दाखल केलाय.  पावेल अँटोव्ह (65) आणि त्यांचे सहकारी व्लादिमीर बेदेनोव्ह (61) हे ओडिशाच्या रायगडा शहरातील साई इंटरनॅशनल हॉटेलमध्ये उतरले होते. 

22 डिसेंबरच्या सकाळी बेदेनोव्ह हॉटेलच्या खोलीत बेशुद्धावस्थेत सापडले. त्यांना तातडीने स्थानिक रुग्णालयात हलवण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.  त्यानंतर दोन दिवसांनी म्हणजेच शनिवारी संध्याकाळी रशियन खासदार पावेल अँटोव्ह रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचं हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी पाहिलं. त्यांचाही मृत्यू झाला होता.

हॉटेलच्या खिडकीतून खाली पडल्याने पावेल अँटोव्ह यांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं. पण विशेष म्हणजे अँटोव्ह खाली पडल्याचा आवाज हॉटेलच्या एकाही कर्मचाऱ्याला आला नाही. परदेशी पर्यटकांच्या मृत्यूशी संबंधित असलेलं हे प्रकरण, ओडिशा सरकारने राज्याच्या क्राईम ब्रांचकडे सुपूर्द केलं आहे. क्राईम ब्रांचने बुधवारी घटनास्थळी पोहोचून तपासाला सुरुवात केली आहे.

आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये चर्चा

या दोन रशियन नागरिकांच्या मृत्यूची चर्चा केवळ भारतातच नाही तर आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये सुद्धा सुरू आहे. यामागे मोठं कारण म्हणजे अँटोव्ह यांनी युक्रेन युद्धावर टीका केली होती.

पावेल अँटोव्ह हे पुतिन यांचे उघड टीकाकार असल्याचं लंडनच्या डेली मेलने म्हटलंय.

तर दुसरीकडे अँटोव्ह यांनी युक्रेनची राजधानी असलेल्या किव्हवर झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्याचा निषेध केला होता असं न्यूयॉर्क टाइम्सने त्यांच्या एका आर्टिकल मध्ये म्हटलंय. 

तपासात काय उघड झालं?

या नागरिकांसोबत तुरोव आणि नतालिया असं एक रशियन दाम्पत्य सुद्धा होतं.

या दोघांची आणि तसेच ट्रॅव्हल एजंट जितेंद्र सिंह यांची क्राईम ब्रांचकडून चौकशी सुरू आहे.

 या तिघांनाही रायगडावरून भुवनेश्वरला आणण्यात आलंय. क्राइम ब्रांचचे आयजी अमितेंद्र नाथ सिंह यांनी रात्री उशिरापर्यंत या तिघांची चौकशी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here