देवळाली प्रवरा / प्रतिनिधी :
राहुरी पोलिस ठाणे हद्दीत चोरीचे वाहने शोध मोहिम सुरु असताना या मोहिमेत चक्क पोलिसाच्या मोटारसायकलवर फॅन्सी नंबर प्लेट लावल्याची तक्रार पुढे आल्यानंतर राहुरी पोलिसांनी पोलिसाच्या मोटारसायकलवर दंडात्मक कारवाई करुन प्रमाणित नंबर प्लेट बसविल्यानंतरच मोटारसायकल पोलिसाच्या ताब्यात देण्यात आली.पोलिसाच्या मोटारसायकलवर राहुरीत प्रथमच कारवाई झाल्याने पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्यासह कारवाई करणाऱ्या पोलिसांचे नागरिकांनी अभिनंदन केले आहे.
राहुरी पोलीस ठाणे हद्दीत विना नंबर प्लेट कारवाई करून चोरीचे वाहन पकडण्याची मोहीम राबवली जात असताना कारवाई दरम्यान एका पोलिसाच्या मोटारसायकलला फॅन्सी नंबर प्लेट असल्याचे नागरिकांनी निर्दशनात आणून दिले.वाहतुक पोलीस हवालदार बापू फुलमाळी यांनी संबंधित पोलीस कर्मचाऱ्याच्या मोटारसायकलवर फॅन्सी नंबर प्लेटची असल्याची खात्री करुन मोटारसायकल चालक असलेल्या कर्मचाऱ्यास एक हजार रुपये दंड आकारून तो जागेवर भरण्यास सांगितले.त्या पोलिस कर्मचाऱ्याने दंड भरला.
वाहतुक पोलिसाने पोलिस कर्मचाऱ्याच्या मोटारसायकलवर कारवाई करुन एक आदर्श प्रस्थापित केला. दंड भरल्यानंतर मोटारसायकल पोलीस ठाण्यात आणून तिच्यावर प्रमाणित नंबर प्लेट बसून घेतल्यानंतर पोलिस कर्मचाऱ्याच्या ताब्यात मोटारसायकल देण्यात आली. पोलिस कर्मचाऱ्याच्या मोटारसायकलवर कारवाईचे करुन नियम सर्वांना सारखा असतो हे दाखवून कारवाईतून दाखवून दिल्याने पोलीस निरीक्षक संजय ठेंगे वाहतूक पोलिस कर्मचारी बापू फुलमाळी यांचे नागरिकांकडून अभिनंदन करण्यात आले.