नगर – दिव्यत्वाची जेथे प्रचिती, तेथे कर आमचे जुळती” या उक्तीप्रमाणे लावण्याने मिळवलेले यश तिच्या दिव्यत्वाची प्रचिती देते. एका कामकरी, कष्टकरी समाजातून व अल्पशिक्षित कुटुंबातून येऊन तिने मारलेली कर्तृत्वाची उंच गगनभरारी प्रेरणादायी. नावाप्रमाणे ‘बुद्धीचे लावण्य’ अर्थात बौद्धिक सौंदर्य धारण करत तिने आपल्या जिद्द, मेहनत, चिकाटी आणि आपल्या अंगी असलेल्या शारीरिक व बौद्धिक नैपुण्याच्या जोरावर नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या भारतातील सर्वात कठीण परिक्षांपैकी एक असणाऱ्या परीक्षेत प्री, मेन्स आणि मैदानी क्षमतांचा कस पाहणाऱ्या परीक्षेत नुकतीच पदवी धारण केल्याने तिने, पहिल्याच प्रयत्नात यश मिळवत ‘पोलीस उपनिरीक्षक’ या पदाला घातलेली गवसणी, तिने मिळवलेले यश, मारलेली मजल अनेकांना मार्गदर्शक. शारीरिक, बौद्धिक कौशल्याची सर्वार्थाने परीक्षा पाहणाऱ्या भरती प्रक्रियेतून ‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’ हे ब्रीद असणाऱ्या महाराष्ट्र पोलीस सेवेत तिची झालेली निवड म्हणजे तिच्या शिरपेचात खोवेलला मानाचा तूराच. लावण्याच्या या यशाच्या माध्यमातून तिने आपल्या कुटुंबाच्या तसेच पद्मशाली समाजाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. तिचे हे यश येणाऱ्या भावी पिढ्यांसाठी निश्चितच दिशादर्शक ठरेल हा विश्वास आम्हाला आहे,असे प्रतिपादन सुमित इप्पलपेल्ली यांनी केले.
कु. लावण्या हिने आपल्या कर्तृत्वाचा वारू असाच चौखूर उधळत राहून दशदिशाही तीला शरण याव्यात या शुभेच्छासह तिचा या भीमपराक्रमाचा सार्थ अभिमान आहे आणि तिचा आदर्श घेऊन पद्मशाली समाजातील मुली देखील स्पर्धा परीक्षा उतीर्ण होऊन अधिकारी बनतील असे सुरेखा विद्ये यांनी सांगितले.
कु. लावण्या हिचा पद्मशाली युवाशक्ति ट्रस्ट कडून सन्मान पत्र देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी लावण्याचे वडील देवीदास जक्कन, विनायक जक्कन, शुभम जक्कन, कुणाल बुरगुल, कुणाल दुडगू, पद्मशाली युवाशक्तीचे योगेश म्याकल, अजय म्याना, सुमित इप्पलपेल्ली, दिपक गुंडू, नारायण मंगलारप, श्रीनिवास इप्पलपेल्ली, सागर बोगा, श्रीनिवास एल्लाराम, योगेश ताटी, पोलिस अधिकारी राहुल गुंडू, अभिजीत आरकल पद्मशाली महिला शक्तीच्या सुरेखा विद्दये, सारिका मुदिगोंडा, उमा बडगु, लक्ष्मी म्याना, निता बल्लाळ, सुनंदा नागुल, सुनंदा रच्चा, रेणुका जिंदम, सुरेखा कोडम, वैशाली कुरापट्टी, सविता येंनगदुल, वर्षा म्याकल यांनी विशेष परिश्रम घेतले. सूत्र संचालन नीता बल्लाळ यांनी केले तर आभार उमा बडगू यांनी मानले.