मानधन वाढीचा प्रश्न मार्गी लागणार
कोपरगाव ( वार्ताहर) : महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील Radhakrushna Vikhe यांना पोलीस पाटील सेवाभावि फाउंडेशन अहमदनगर जिल्हाच्या वतीने लवकरात लवकर पोलीस पाटलांच्या मानधनाचा प्रश्न मार्गी लावून मानधन वाढ झाली पाहिजे याकरीता येणाऱ्या अधिवेशनात चर्चा करण्यात यावी यासाठी विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
यावेळी कोपरगाव तालुक्याचे आमदार आशुतोष काळे, महानंदाचे अध्यक्ष राजेश परजने, कोपरगाव नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष विजयराव वहाडणे, भाजपचे सामाजिक कार्यकर्ते वसंतराव जाधव, पोलीस पाटील सौ. विद्या दुबे, सौ.राधा मलिक , निळू रणशुर, बाबासाहेब गायकवाड, दीपक शिंदे, विलास मोरे, दगडू गुडघे, पंडित पवार आदी सह पोलीस पाटील मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोपरगाव पोलीस पाटील फाउंडेशनच्या वतीने नामदार राधाकृष्ण विखे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ना. विखे यांनी सांगितले की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून पोलीस पाटलांचे मानधन व त्यांच्या विविध मागण्या मान्य करण्यासाठी अधिवेशनातही चर्चा केली जाईल.पोलीस पाटलांच्या मानधन वाढीचा प्रश्न तसेच त्यांचे विविध मागण्या पूर्ण करण्यासाठी त्यांनी आश्वासन दिले. सूत्रसंचालन पोलीस पाटील दगू गुडघे यांनी केले तर आभार पोलीस पाटील पंडित पवार यांनी मानले.